dhangar community agitation on Faltan | Sarkarnama

धनगर समाजाने घातला सरकारचा गोंधळ 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 5 ऑगस्ट 2018

फलटण : धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने येथील अधिकार गृह इमारतीसमोर धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये (एस.टी.) समावेश करावा या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. आंदोलनस्थळी धनगर समाज बांधवानी राज्य सरकारच्या विरोधात जागरण, गोंधळ करून आपल्या मागण्यासाठी एल्गार पुकारला. 

महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हणमंतराव सुळ यांनी धरणे आंदोलनास भेट देवून पाठिंबा व्यक्त केला. यावेळी हणमंतराव सुळ म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला. परंतू तत्कालीन राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक धनगर समाजाला या आरक्षणापासुन वंचित ठेवल्याचा आरोप करीत या सरकारने त्याची त्वरित अंमलबजावणी करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. ती त्वरित मान्य होईल, ही अपेक्षा या सरकारकडून व्यक्त करू. 

धनगर समाज बांधवांचे बेमुदत धरणे आंदोलन गेले आठ दिवसांपासून सुरू आहे. हे आंदोलन समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने करावे. कुठलाही अनुचित प्रकार करून शासनाच्या मालमत्तेची हानी होईल असे कृत्ये करू नये, असे आवाहन त्यांनी केले. या आंदोलनास बारामती पंचायत समिती चे माजी सभापती अविनाश गोफणे, माळेगांव साखर कारखान्याचे संचालक अविनाश देवकाते, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गुलाबराव देवकाते यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख