dhangar and maratha will fight together : deokate | Sarkarnama

धनगर व मराठा एकत्र लढा देणार : विश्वास देवकाते

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 24 जुलै 2018

माळेगाव : "केंद्र व राज्यात भाजपच्या नेत्यांनी निवडणुकांना सामोरे जाताना मराठा, धनगर समाजाला आरक्षणाची स्वप्ने दाखविली. या गोष्टीला चार वर्षे उलटून गेली. परंतु, लोकांच्या हाती काहीच न पडल्याने खरेतर समाजबांधवांच्या भावना तीव्र झाल्या. त्याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत,'' असा आरोप करत पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी यापुढे मराठा व धनगर समाज एकत्रितरीत्या न्याय हक्कासाठी सरकारविरोधी लढा देणार आहे, असा इशारा दिला.
 
पुणे जिल्ह्यात मराठा समाज आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलकांनी सर्वत्रच निर्णायक भूमिका घेतल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आंदोलकांनी आज पुकारलेल्या "बंद'ला बारामतीमध्ये बहुसंख्य लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. तोच धागा पकडत पत्रकारांशी बोलताना देवकाते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. सरसकट कर्जमाफी नाही. उद्योग- व्यापार क्षेत्रात मंदी आहे, आदी मुद्द्यांच्या आधारे सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. 

पणदरे येथे "रास्ता रोको' 
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात नीरा राज्य मार्गावर मराठा समाज बांधवांनी रस्ता रोको, टायर पेटवून देऊन गावोगावी सरकारी धोरणांचा निषेध केला. माळेगावातील राजहंस चौकात शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मराठा समाज बांधवांवर शिक्षण, नोकरी आदी क्षेत्रांत अन्याय होत असल्याचे सांगितले. बेरोजगारीमुळे मराठा देशोधडीला लागल्याचे सांगत पणदरेमध्ये आंदोलकांनी बाजारपेठा पूर्ण "बंद' ठेवून निषेध नोंदविला. अशीच काहीशी स्थिती सांगवीमध्ये पाहावयास मिळाली. त्यामुळे मंगळवारी नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले होते. तसेच, अनेक ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये व्यवहार ठप्प झाल्याचे जाणवले. 

बस पेटविणाऱ्यांवर गुन्हा 

पाहुणेवाडी येथे सोमवारी (ता. 23) बारामती-फलटण एसटी बस पेटविण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच, दगडफेक करून गाडीचे मोठे नुकसान केले होते. याबाबत अज्ञात लोकांविरुद्ध बसचालक मिलिंद भोसले यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख