dhangar agitation in nashik | Sarkarnama

भाजप प्रभाग सभापतींच्या नेतृत्वाखाली नाशिकात धनगरांचे आंदोलन 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

नाशिक ः धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज धनगर समाजातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या. विशेष म्हणजे या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे प्रभाग सभापती धनंजय उर्फ पप्पु माने यांनी केले. 

नाशिक ः धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज धनगर समाजातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या. विशेष म्हणजे या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे प्रभाग सभापती धनंजय उर्फ पप्पु माने यांनी केले. 

धनगर समाज संघ समिती, भटके विमुक्त आघाडीतर्फे सकाळी दहाला शिवाजी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निर्दशने करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या महिला व कार्यकर्त्यांनी आरक्षण न दिल्यास राज्यभर चक्का जाम करण्याचा इशारा देण्यात आला. भाजप नेत्यांनी बारामती येथील सभेत सत्तेत येताच धनगर समाजाला तात्काळ आरक्षणलागू करु अशी घोषणा केली होती. 

तसे लेखी पत्र धनगर समाज संघर्ष समितीला दिले होते. मात्र सत्तेत येऊन चार वर्षे होऊनही त्याबाबत सरकार काहीच कृती करीत नाही. 5 नोव्हेंबर, 2017 रोजी नागपूर येथील धनगर आरक्षणनिर्णायक मेळाव्यात सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा झाली. 

शासनाने ननेमलेल्या "टीस' संस्थेचा अहवाल काहीही येवो सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले पाहिजे. अन्यथा राज्यभर आंदोलन केले जाईल असा इशारा देणारे निवेदन यावेळी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी बापूसाहेब शिंदे, नवनीत वजीरे, डॉ. तुषार चिंचोले, भाऊसाहेब ओहळ, सतिश रावते, मिनाताई बिडगर, संगीता कंखर, अतुल कुमार आदी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख