dhangar agitaion in phaltan | Sarkarnama

फलटणला आरक्षणासाठी धनगरांचा बेमुदत ठिय्या 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 जुलै 2018

फलटण : विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात करुन त्यानुसार आरक्षण देण्याबाबत दिलेला शब्द शासनाने पाळलेला नाही. त्याच्या निषेधार्थ व आता तातडीने धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी धनगर समाजाने फलटण तहसिल कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. 

यासंदर्भात धनगर समाजाने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, राज्य शासनाने आरक्षणाबाबत चाल ढकल केली आहे. 2014 मध्ये विधानसभा निवडणूकीदरम्यान बारामती येथे धनगर समाजाने उपोषण करुन आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन मागे घ्या, भाजपची सत्ता आल्यावर धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन दिले होते. तथापी ते पाळलेले नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख