वीज बिलांच्या वसुलीसाठी गेलात तर शेतकरी दांडके घेऊन मागे धावतील : धनंजय मुंडे

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राजकीय धुसफूस सुरूच आहे. आता वीज बील वसुलीवरून राजकीय आखाडा पेटणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. ऊस दराच्या प्रश्नांवरून ऊस पट्टा पेटला असताना आता वीज बिलावरून संपुर्ण राज्यातच शेतकरी आंदोलनाचा भडका उडणार असल्याचे दिसत आहे.
वीज बिलांच्या वसुलीसाठी गेलात तर शेतकरी दांडके घेऊन मागे धावतील : धनंजय मुंडे

मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राजकीय धुसफूस सुरूच आहे. आता वीज बील वसुलीवरून राजकीय आखाडा पेटणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. ऊस दराच्या प्रश्नांवरून ऊस पट्टा पेटला असताना आता वीज बिलावरून संपुर्ण राज्यातच शेतकरी आंदोलनाचा भडका उडणार असल्याचे दिसत आहे.

"शेतकरी अडचणीत असतांना वीज बील वसुली कशी करता?" असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारला आहे. वीज बिलांच्या वसुलीसाठी बावनकुळे यांनी आमदारांना पत्र लिहिल्यानंतर मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रीया 'सरकारनामा'ला दिली आहे.

धनजंय मुंडे म्हणतात, "शेतकऱ्यांचा खरिपाचा माल बाजारात आला आहे. मात्र, भाव नाही. खरेदी केंद्र नीट सुरू नाहीत. व्यापारी हमीभावाइतकाही भाव देत नाहीत. शेतकरी संकटात आहे. कर्जमाफी आयटीच्या घोटाळ्यामध्ये अडकली आहे, अशा वेळी वसुली कशी करता?'' सरकार शेतकऱ्यांला अडचणीत आणण्यासाठीच धोरणे राबवत आहे का? असा सवाल धनांजय मुंडे यांनी ऊर्जामंत्री चांद्रशेखर बावनकुळे यांना विचारला आहे.

कृषिपंपाच्या वीज बिलाच्या वसुलीसाठी बावनकुळे यांनी चक्क आमदारांना पत्र पाठवून मतदार संघात मेळावे घ्या, वसुली करा अशी पत्रे पाठवली आहेत. त्याचा निषेध करत धनंजय मुंडे म्हणाले, "मागील दीड वर्षांपासून दुष्काळ नसतांना दुष्काळी कर वसूल केला आहे. या करातील कोट्यवधी रुपये कुठे गेले? सरकारने या जमा केलेल्या करातून कृषी पंपाची बाकी भरावी आणि शेतकऱ्यांचे बील माफ करावे." भाजपच्या आमदारांना कृषी पंपाची वीज बील वसुली करण्याचे काम मान्य आहे का? असा सवाल करतानाच त्रस्त संतापलेला शेतकरी वसुली करण्यासाठी येणाऱ्यांच्या मागे दांडके घेऊन लागल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मुंडे यांनी दिला आहे. आधी नीट कर्जमाफी करा आणि नंतर वसुलीचे पहा असे खडे बोलही धनंजय मुंडे यांनी सरकारला सुनावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com