धनंजय मुंडेंचे तीस दिवसांचे `रिपोर्ट कार्ड` : नेत्यांनी केले कौतुक

....
dhananjay-munde-meeting
dhananjay-munde-meeting

मुंबई : राज्याच्या सामाजिक न्याय मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून धनंजय मुंडे यांनी महिन्याभरात जनहितार्थ घेतलेल्या निर्णयांचा व केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडून पुन्हा एकदा त्यांनी वेगळेपणा दाखवत जनतेची मने जिंकली आहेत. मंत्री पदाची धुरा हाती घेतल्यापासून अगदी शपथविधीपासून पुढील एक महिन्यात केलेल्या कामकाजाचा तब्बल ४० पानी अहवाल (रिपोर्ट कार्ड)  मुंडेंच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आला आहे.

हा अहवाल मुंडे यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांना दिला. पक्षाच्या प्रत्येक मंत्र्याने असे रिपोर्ट कार्ड करायला हवे, अशा शब्दांत या नेत्यांनी उपक्रमाचे कौतुक केले. 

या अहवालामध्ये मंत्री पदाचा शपथविधी झाल्यापासून प्रत्येक दिवशी विभागाच्या झालेल्या बैठका, त्या बैठकीत झालेले निंर्णय यांसह मंत्रालयात, जिल्ह्यात व शासकीय बैठकांमध्ये महिन्यातील एकूण उपस्थिती यांची सविस्तर माहिती फोटोसहित छापलेली आहे. मुंडे यांनी पहिल्याच टप्प्यात इंदू मिल येथील नियोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची जबाबदारी स्वतःच्या खात्याकडे मिळवली, येथील स्मारकाची  शरद पवार यांच्यासह पाहणी करून स्मारकाची उंची १०० फुटाने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तृतीय पंथीयांचे कल्याणकारी महामंडळ, संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळी होणारे स्मारक आदी सर्व निर्णयांची माहिती या अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व लोक प्रतिनिधी व विविध विभागातील अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतला होता, त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्याच्या विकास आराखड्यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, याबाबतही या अहवालामध्ये सविस्तर नोंद दिसते.

२६ जानेवारी रोजी बीड जिल्हा पोलीस मुख्यालय येथील झेंडा वंदन झाल्यानंतर बीड तालुक्यातील ५ अंध व्यक्तींना दिलेली लाख मोलाची मदत बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या मनात बसली होती, त्याचबरोबर बार्टी च्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या ३ लाख विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याच्या खा. शरद पवार यांच्या सुचनेनुसार तात्काळ घेतला.

या व अशा सर्व कामकाजाची माहिती  मुंडे यांनी जारी केलेल्या अहवालामध्ये देण्यात आली आहे. मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आपण केलेल्या कामकाजाचा असा अहवाल, मंत्रिमंडळ बैठका व मंत्रालय, जिल्हा व मतदारसंघातील उपस्थिती यासह सामान्य जनतेसमोर मांडणारे धनंजय मुंडे हे पहिलेच मंत्री असावेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी व जनतेतून अशा सर्व स्तरावर मुंडेंच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com