धनंजय मुंडेंचा 'डोळस'पणा दोन अंध कुटुंबांना जगण्याची 'दृष्टी' देऊन गेला

Dhananjay Munde Gave Relief to Blind Families
Dhananjay Munde Gave Relief to Blind Families

बीड : एकाच गावातील एकमेकांचे नातेवाईक असलेले दोन्ही कुटुंबातील सर्वच सदस्य अंध आहेत. पण कलावंत असल्याने कलेच्या माध्यमातून कसेबसे पोटाची खळगी भरु शकतात. पण त्यांचे जगणे अगदीच परावलंबी. माऊली सिरसाट हे समाजसेवक त्यांना कुठे सार्वजनिक पंगत असली की जेवायला घेऊन जातात. त्यांनी सोमवारी या अंध कुटुंबांची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घडवून आणली आणि दोन्ही कुटुंबाला आता जगण्याची दृष्टीच मिळाली आहे.

बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथील यादव निवृत्ती क्षीरसाग, विठ्ठलबाई यादव क्षीरसागर, व त्यांचा मुलगा सम्राट यादव क्षीरसागर तर दुसऱ्या कुटुंबातील राजाबाई साठे, मुरलीधर साठे, छगूबाई साठे हे दोन्ही कुटूंब एकमेकांचे नातेवाईक आहेत. दोन्ही कुटूंबातील हे पाचही सदस्य अंध आहेत. त्यांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रीयाही झाल्या. परंतु, त्यांना दृष्टी मिळाली नाही. काही कला त्यांनी अवगत केल्या आणि त्यातून पोटाची खळगी भरु लागली. त्यांना देवही दृष्टी देऊ शकला नाही आणि डॉक्टरही. पण, त्यांची योगायोगाने धनंजय मुंडेंशी भेट झाली आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी नवी दृष्टीच भेटली आहे. 

शुक्रवारी जिल्हा परिषद सभापती निवडीसाठी धनंजय मुंडे बीडला आले होते. विश्रामगृहावर बसलेल्या धनंजय मुंडेंची सभापतींची नावे निश्चित करण्याची धावपळ सुरु होती. नेत्यांचा समन्वय करणे, नाराजांची समजूत काढणे अशा विविध पातळ्यांवर धनंजय मुंडे या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात होते. याच वेळी बाहेर त्यांना हे अंध दिसले. ‘बाबा काय’ अशी विचारणा केल्यानंतर या कुटुंबियांनी व्यथा मांडायला सुरुवात केली. 'चला आत मध्ये बसून बोलू' म्हणून धनंजय मुंडेंनी त्यांना आतमध्ये घेतले आणि सोफ्यावर बसून त्यांनी सर्व हकिगत ऐकली. याच वेळी सहाय्यकांना सांगून जिल्हा परिषद व शासनाच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना तत्काळ बोलवूनही घेतले.

या कुटुंबातीलसदस्यांना वृद्ध कलावंत योजनेतून प्रत्येकी दोन हजार रुपये शासनाचे अनुदान, अपंग बीज भांडवल योजनेतून दिड लाख रुपयांचे भांडवल, जिल्हा परिषद सेस फंडातून मदत, जिल्हा अपंग निधीतून पालकमंत्र्यांच्या अधिकारातून मदत करण्याची घोषणा आणि निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले. मंत्री व लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या अडचणी सोडविण्याच्या कर्तव्याच्या पुढे जात अगदी संवेदनशिलपणे आणि अपुलकीने म्हणणे ऐकून घेऊन आधार दिल्याने या कुटुंबालाही नवदृष्टी मिळाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावरुन दिली. विशेष म्हणजे सर्वच जण अंध असल्याने यांना शासन योजना मिळण्यासाठी कागदपत्र जमा करण्याचा खाटाटोप करण्याचा यक्षप्रश्नही धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांवर सोपवून तसे निर्देश दिले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com