रेल्वेने उशीर केला; पण धनंजय मुंडेंनी वेळेवर पोहचविले... - dhananjay munde helpd bsf jawan | Politics Marathi News - Sarkarnama

रेल्वेने उशीर केला; पण धनंजय मुंडेंनी वेळेवर पोहचविले...

जगदिश पानसरे
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

...

औरंगाबाद : सुटी संपवून परत देशसेवेसाठी निघालेल्या वैभव मुंडे यांचे औरंगाबादहून मुंबईला जाणारे विमान हुकले. त्यामुळे चिंतेत असलेल्या या जवानाच्या मदतीला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे धावून आले आणि जवानाचा जीव भांड्यात पडला. 

परळी तालुक्‍यातील पांगरी येथील रहिवाशी असलेले वैभव मुंडे यांचे औरंगाबादहून मुंबईला जाणार विमान हुकल्याने त्यांना पुढे श्रीनगरला जाण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता पुढे काय? या विंवचनेत असलेल्या वैभव यांच्यासाठी मुंबईला निघालेले धनंजय मुंडे धावून आले आणि त्यांनी वैभव मुंडे यांना श्रीनगरला जाणाऱ्या दुसऱ्या विमानाचे तिकीट मिळवून दिले.

श्रीनगर येथे रुजू होण्यासाठी वैभव मुंडे यांनी औरंगाबादहून दिल्ली मार्गे श्रीनगरसाठी आज सकाळी विमान होते. पण परळीहून रेल्वेने औरंगाबादला यायला उशीर झाल्याने त्यांचे विमान हुकले. वेळेवर बीएसएफ मुख्यालयात पोहचलो नाही तर कारवाईचा सामना करावा लागेल? या चिंतेत वैभव मुंडे विमानतळावर हताश होऊन बसले होते. त्याचवेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे दोन दिवसांचा बीड दौरा संपवून मुंबईला जाण्यासाठी चिकलठाणा विमानतळावर आले.

तेव्हा अचानक त्यांचे लक्ष आपल्याच मतदारसंघातील बीएसएफ जवान वैभव मुंडे यांच्याकडे गेले. निराश होऊन बसलेल्या वैभव यांच्याकडे धनंजय मुंडे यांनी चौकशी केली, तेव्हा त्यांना सगळा प्रकार समजला.  तात्काळ त्यांनी आपल्या मुंबईतील कार्यालयामार्फत सुत्रे हालवली आणि वैभव यांच्यासाठी एअर इंडियाच्या विमानाचे औरंगाबाद- दिल्ली- श्रीनगर असे तिकीट काढून दिले. आता श्रीनगरच्या मुख्यालयात वेळेवर पोहचता येईल याचा आनंदात वैभव मुंडे यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. धनंजय मुंडे यांचे आभार मानत वैभव यांनी श्रीनगरकडे प्रयाण केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख