अकोलेकरांच्या डोळ्यांत पिचड यांच्याविषयी प्रचंड राग!

डॉ. लहामटे म्हणाले, आपण राजूर गटात साडेचार कोटींची, तर सातेवाडी गटात 14 कोटींची विकासकामे जिल्हा परिषद सदस्य असताना केली.
अकोलेकरांच्या डोळ्यांत पिचड यांच्याविषयी प्रचंड राग!

अकोले (नगर) : "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचार नसल्याचे सांगतात. एवढा विकास केला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांची प्रचारासाठी गरज का लागली? '' असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

'राष्ट्रवादी'चे उमेदवार डॉ. किरण लहामटे याच्या प्रचारार्थ राजूर येथील बाजारतळावर आयोजित सभेत मुंडे बोलत होते. अध्यक्षस्थानी सोन्याबापू वाकचौरे होते. ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, संदीप वर्पे, कपिल पवार, बबलू वामन, दशरथ सावंत, डॉ. अजित नवले आदी उपस्थित होते. 

मुंडे म्हणाले, "अकोलेकरांच्या डोळ्यांत दोन गोष्टी प्रकर्षाने दिसतात. एक पिचड यांच्याविषयी राग आणि दुसरी डॉ. किरण लहामटे यांच्या विजयाचा निर्धार. त्यामुळे ही निवडणूक "जनता विरुद्ध नेता' अशी आहे. एकाचे दोन केल्यानेच त्यांना पक्ष सोडावा लागला.'' 

ते  म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत भाजपला देशाने 300 पेक्षा अधिक खासदार दिले. असे असताना याला घेऊ का त्याला, असे भाजप करीत आहे. राज्यातील प्रश्‍नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी ही मेगाभरती केली. भाजपमध्ये जाणाऱ्यांची मतदारसंघात चव गेली. मतदारसंघात निवडून येणे शक्‍य नसल्याने मोदी लाटेच्या अपेक्षेने ते भाजपमध्ये गेले.'' 

मुंडे म्हणाले, "उमेदवारीसाठी अशोक भांगरे व डॉ. लहामटे इच्छुक होते. त्या वेळी, "लहामटे, तुम्ही लढा. मी ताकद देतो,' असे म्हणत लहामटे यांची पूर्ण प्रचारयंत्रणा सांभाळणाऱ्या भांगरे यांचे कार्य कौतुकास्पद आहे, हे उदाहरण मी राज्यभर देईन. अकोल्यात गुलाल घ्यायला नक्की येईन.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com