आजचा वाढदिवस : धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य.

आजचा वाढदिवस - धनंजय मुंडे जन्म तारीख : १५ जुलै १९७५जिल्हा परिषद सदस्य ते वरिष्ठ सभागृहाचे विरोधी पक्षनेते -धनंजय मुंडे यांची राजकीय सुरुवात जिल्हा परिषद सदस्यपदापासून झाली. बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. भाजपमध्ये असताना भारतीय जनता युवा मोर्चाचे ते प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर त्यांची विधान परिषदेवर निवड झाली. २०१२ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
आजचा वाढदिवस : धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य.

धनंजय मुंडे यांची राजकीय सुरुवात जिल्हा परिषद सदस्यपदापासून झाली. बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. भाजपमध्ये असताना भारतीय जनता युवा मोर्चाचे ते प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर त्यांची विधान परिषदेवर निवड झाली. २०१२ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परळी विधानसभा मतदार संघातील पराभवानंतर राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिले. दरम्यान, त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने परळी नगर पालिकेत विजय मिळविला असून गेल्या वर्षी झालेल्या जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीतही मतदार संघात दमदार कामगिरी केली आहे.

परळी बाजार समितीही धनंजय मुंडे यांच्या वर्चस्वाखाली असून संत नागा जगमित्र सहकारी सुतगिरणीचे ते संस्थापक आहेत. त्यांनी साखर कारखान्याची उभारणीही सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा संघटनेवरही त्यांचेच वर्चस्व आहे. आक्रमक वक्ते असलेले धनंजय मुंडे विधान परिषद सभागृह आणि सभागृहाबाहेर सरकारवर तुटून पडतात. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com