आजचा वाढदिवस : धनंजय मुंडे,  विरोधी पक्षनेते, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य.  - dhananjay-munde-birthday | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : धनंजय मुंडे,  विरोधी पक्षनेते, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य. 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 15 जुलै 2018

धनंजय मुंडे यांची राजकीय सुरुवात जिल्हा परिषद सदस्यपदापासून झाली. बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.

धनंजय मुंडे यांची राजकीय सुरुवात जिल्हा परिषद सदस्यपदापासून झाली. बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. भाजपमध्ये असताना भारतीय जनता युवा मोर्चाचे ते प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर त्यांची विधान परिषदेवर निवड झाली.

2012 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. परळी विधानसभा मतदार संघातील पराभवानंतर राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिले. दरम्यान, त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने परळी नगरपालिकेत विजय मिळविला असून गेल्या वर्षी झालेल्या जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकीतही मतदार संघात दमदार कामगिरी केली आहे.

परळी बाजार समितीही धनंजय मुंडे यांच्या वर्चस्वाखाली असून संत नागा जगमित्र सहकारी सुतगिरणीचे ते संस्थापक आहेत. त्यांनी साखर कारखान्याची उभारणीही सुरु केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हा संघटनेवरही त्यांचेच वर्चस्व आहे. आक्रमक वक्ते असलेले धनंजय मुंडे विधान परिषद सभागृह आणि सभागृहाबाहेर सरकारवर तुटून पडतात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख