dhananjay munde and amit deshmukh photo viral | Sarkarnama

हा फोटो `व्हायरल` होताच तो `हंसों का जोडा` आठवला...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 2 मार्च 2020

....

पुणे : माजी मुख्यमंत्री (स्व.) विलासराव देशमुख आणि माजी उपमुख्यमंत्री (स्व) गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीचे धागे हे दोन्ही नेते विरोधी पक्षात असतानाही आयुष्यभर पक्के राहिले. काॅलेज जीवनापासून सुरू झालेली ही मैत्री राजकारणाच्या विविध शिखरांवर दोन्ही नेते पोहोचलेले असताना आणखी बहरली. या मैत्रीचा वारसा या दोघांच्या कुटुंबियांत पुढे चालविणार असल्याचा मनोदय सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत मुंडे यांचा एखा बैठकीतला फोटो व्हारयल झाला आणि अनेकांनी जुनी मैत्री आठवली. अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यायाच्या प्रश्नी मुंडे हे अमित देशमुख यांच्या केबिनमध्ये बैठकीसाठी गेले होते. तेव्हा या दोघांमधील फोटो क्लिक झाला. तो सोशल मिडीयात व्हायरलही झाला. त्याची दखल मुंडे यांनीही घेतली.

Image may contain: 3 people, people standing and outdoor   

``स्व. गोपीनाथ मुंडे साहेब आणि स्व. विलासराव देशमुख साहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणात दो हंसो का जोडा म्हणून प्रसिद्ध होते. दोघांचीही निखळ मैत्री राजकारणापलिकडे होती. १९८० साली दोघेही पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधिमंडळात दाखल झाले. मराठवाड्याचे हे सुपुत्र शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्राच्या हितासाठी झटले. नियतीचा खेळ बघा, आज अमित देशमुख लातूरचे प्रतिनिधित्व करत आहेत तर मी परळीचे प्रतिनिधित्व करत आहे. आम्ही दोघेही ही मैत्री पिढ्यानपिढ्या अशीच ठेवू. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठवाड्याच्या हितासाठी लढू,``असा आशावाद मुंडे यांनी व्यक्त केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख