पंकजा मुंडेच्या प्रचाराला देताहेत राजश्री धनंजय मुंडे प्रत्युत्तर 

गृहीणी असलेल्या राजश्री मुंडे यांनीही यापूर्वी मागच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवारांचा प्रचार केलेला आहे.
Rajashri-Dhanajay-Munde
Rajashri-Dhanajay-Munde

परळी (जि. बीड) : मागच्या विधानसभा निवडणुकीपासून आताच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता परळी मतदार संघाचा आलेख चढउताराचा राहीला आहे. आगामी निवडणुकीसाठी आता मुंडे बहिण - भावांत लढत निश्चित मानली जात आहे.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासाठी त्यांच्या सौभाग्यवती जयश्री मुंडे मैदानात उतरल्या आहेत. राजश्री मुंडे दोन दिवसांपासून परळी शहरातील काही धार्मिक कार्यक्रमांसह त्यांनी महिला मंडळांच्या भेटी घेऊन संवाद साधला. 

दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे होमपिच असल्याने परळीच्या लढतीकडे कायम राज्याचे लक्ष राहीलेले असे. पुढे त्यांच्या घरात राजकीय दुफळी झाल्याने परळी अधिकच चर्चेत आली. मागच्या वेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात लढत झाली. त्यात धनंजय मुंडे यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि परळी नगर पालिका निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी या पराभवाची कसर काढत राष्ट्रवादी काँग्रेसला एकतर्फी विजय मिळवून दिला. 

मात्र, वैद्यनाथ बँक आणि वैद्यनाथ कारखान्याची निवडणुक पंकजा मुंडे यांनी जिंकली तर बाजार समितीवर धनंजय मुंडे यांनी वर्चस्व प्रस्थापित केले. एकूणच तोपर्यंत दोघांच्या पारड्यात परळीकरांनी समसमान वजन टाकले. मात्र, लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी ‘माझ्या राजकीय इभ्रतीसाठी बजरंग सोनवणेंना परळीतून लिड द्या’ असे भावनिक आवाहन करुनही भाजपच्या डॉ. प्रितम मुंडे यांनाच मतदार संघातून लिड मिळाली. त्यामुळे आगामी विधानसभेची दोन्ही भावंडांनी आतापासूनच जोरदार तयारी केली आहे. 

विकास कामांचे भूमिपुजन आणि उद॒घाटनांच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांची तयारी सुरु आहे. तर, धनंजय मुंडे हे देखील मतदार संघात संपर्क ठेवून आहेत. आता त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे देखील मैदानात उरतल्या आहेत. त्यांनी महिला मंडळांच्या भेटी, सप्ताहाला भेटी देत संपर्क वाढविला आहे. यापूर्वीही राजश्री मुंडे यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा प्रचार केला. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवारांचा प्रचार केला हेाता.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com