...तर भाजपाला त्याचे परिणाम भोगावे लागतील : धनंजय मुंडे 

विधानसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा भाजपने फोडाफोडीचे राजकारण केले आणित्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले .
dhanajay-Munde
dhanajay-Munde

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर भाजपाला त्याची परिणाम  भोगावी  लागतील , असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना दिला. 


 काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या  आमदारांवर दबाव आणला जात आहे . काँग्रेसच्या  आमदारांना प्रलोभने दाखवली जात आहेत आणि काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप केला आहे .

राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबतीत असा काही अनुभव आला आहे काय असे विचारले असता श्री धनंजय मुंडे म्हणाले ,  आमच्या कुठल्याही आमदाराला आतापर्यंत फोन आलेला नाही किंवा प्रयत्न झालेला नाही . असा प्रयत्न केला तर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील.  विधानसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा भाजपने फोडाफोडीचे राजकारण केले आणि  त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले . त्यांना राज्यातील जनतेने खूप कमी जागा दिल्या.  त्याचप्रमाणे आता सुद्धा त्यांनी फोडाफोडीचा  प्रयत्न केल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. 

राज्यात सत्ता स्थापनेला  होत असलेल्या विलंबाबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले , महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला स्पष्ट  बहुमत दिले .  तुम्ही जनतेसमोर महायुती म्हणून गेलात आणि मते मागितली.  आता जनतेने बहुमत  दिलेले असताना तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी आपसात का भांडत आहात ? मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही आपसात   भांडणे  हे   महापाप आहे . मतदार  तुम्हाला माफ करणार नाही. 

भाजपा सरकार बनवू शकत नसेल तर पर्याय काही आहे का?  राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेशी हातमिळवणी करणार का ? अशी  विचारणा केली असता धनंजय मुंडे म्हणाले,  आमचे नेते शरद पवार यांनी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे.  आम्हाला स्पष्ट बहुमत नाही.  आम्हाला मतदारांनी विरोधी  पक्षात बसण्याचा कौल  दिलेला आहे. यांनी सरकार स्थापन केले की आम्ही विरोधी पक्षाची भूमिका  उत्तम प्रकारे बजावू. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com