Dhanajay Munde Took Lantern March in Parali | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

भारनियमनाच्या विरोधात धनंजय मुंडे कंदील घेऊन मैदानात

दत्ता देशमुख
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

ऐन सणासुदीच्या काळात भारनियमन होत असल्याच्या विरोधात सोमवारी सायंकाळी परळीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर कंदील मोर्चा काढण्यात आला. कारभार सुधारला नाही तर जनताच हाती मशाल घेऊन महावितरण कार्यालयात घुसेन, असा इशारा मुंडे यांनी यावेळी दिला.

परळी (जि. बीड) : सणासुदीच्या दिवसात अघोषित भारनियमन करणाऱ्या महावितरण कंपनीच्या विरोधात सोमवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली  कंदील मोर्चा काढण्यात आला.‘आज आम्ही कंदील मोर्चा काढला आहे, उद्या लोडशेडींग बंद न झाल्यास जनता मशाली घेऊन कार्यालयात घुसल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा यावेळी मुंडे यांनी यावेळी दिला.

गणेशपार भागातून सुरु झालेल्या मोर्चात राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि महिलाही सहभागी झाल्या होत्या. राज्याला वीज पुरवठा करणारे परळी शहरच अंधारात चाचपडत आहे असे सांगत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना वीज निर्मिती करणाऱ्या परळीला भारनियमनमुक्त करुन दिल्याची आठवण मुंडे यांनी यावेळी करुन दिली. फडणवीस सरकारच्या राज्य भारनियमन मुक्त, टँकर मुक्त करण्याच्या घोषणा हवेत विरल्याचा टोलाही त्यांनी लगावला. महावितरणनने नवीन घोषणांचा शुभारंभ करण्यापेक्षा भारनियनमुक्ती करावी असा सल्लाही त्यांनी दिला.

लक्ष्मण पौळ, बाजीराव धर्माधिकारी, बाळासाहेब देशमुख, मधुकर आघाव, आय्युब पठाण, वाल्मिक कराड, दिपक देशमुख, जाबेर खान पठाण, चंदुलाल बियाणी, शरद मुंडे, सुरेश टाक, विनोद जगतकर, अनंत इंगळे, विजय भोयटे, दत्तात्रय गुट्टे, संजय आघाव, बालाजी मुंडे, राजाभाऊ पौळ, दिलीप कराड आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख