परळीच्या लोकप्रतिनिधींना झोप कशी येते ? : धनंजय मुंडें 

शेतकऱ्यांना तीन दिवसांत पीकविमा रक्कम देण्यात येईल; तसेच वैद्यनाथ कारखान्याकडील शेतकऱ्यांचे ऊस देयके 25 ऑगस्टपर्यंत देण्यात येतील, असे उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील ठिय्या आंदोलन बुधवारी (ता. सात) रात्री उशिरा मागे घेण्यात आले.
pankaja_munde_dhanajay_munde
pankaja_munde_dhanajay_munde

परळी वैजनाथ :  शेतकऱ्यांच्या हक्काच्या पीकविम्यातून परळी व अंबाजोगाई तालुक्‍यांनाच कसे वगळले, मंत्र्यांना शेतकऱ्यांचे दुःख कळत नाही, मनातल्या मुख्यमंत्री आहात तर इथला पीकविमा कुठे गेला? असा सवाल करत त्यांना झोप कशी येते ? असा प्रश्न  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला . 

ऊसबिलात राजकरण, पक्ष पाहून शेतकऱ्यांचे पैसे रोखले, मोजक्‍याच शेतकऱ्यांना 1400 रुपये प्रमाणे बिल देऊन निवडणूक जिंकली; मात्र नंतर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, असा आरोपही त्यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता केला . 

परळी, अंबाजोगाई तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा, वैद्यनाथ कारखान्याने उसाचे पैसे द्यावेत, दुबार पेरणीसाठी हेक्‍टरी 25 हजार रुपयांची मदत द्यावी, जाहीर केलेले तूर, उडीद, मुगाचे अनुदान द्यावे, परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम वेगाने करावे, चुकीची विद्युत देयके दुरुस्त करून द्यावीत, औष्णिक विद्युत केंद्र सुरू करावे, परळी शहरासाठी जायकवाडीचे पाणी खडका धरणात सोडून तेथून ते वितरित करावे आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

मोर्चानंतर ठिय्या आंदोलन सुरू केले. मागण्या मान्य होईपर्यंत ते मागे घेतले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. त्यावेळी झालेल्या सभेत धनंजय मुंडे बोलत होते . 

शेतकऱ्यांना तीन दिवसांत पीकविमा रक्कम देण्यात येईल; तसेच वैद्यनाथ कारखान्याकडील शेतकऱ्यांचे ऊस देयके 25 ऑगस्टपर्यंत देण्यात येतील, असे उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांनी  लेखी आश्वासन दिल्यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील ठिय्या आंदोलन बुधवारी (ता. सात) रात्री उशिरा मागे घेण्यात आले.

  आंदोलनात नगराध्यक्षा सरोजिनी हालगे, राजेश्वर चव्हाण, लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, सभापती कल्पना सोळंके, बालाजी मुंडे आदींनी सहभाग घेतला. दरम्यान, ठिय्या आंदोलनादरम्यान पाऊस आला. पावसातही घोषणाबाजी करीत आंदोलन सुरू होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com