रथयात्रा काढायला स्वत:ला राजा समजता का ?: मुख्यमंत्र्यांना सवाल

पुलवामा हल्ल्याचा निवडणूकीसाठी केलेला उपयोग, विविध पदांची भरती, जीएसटी, उद्योग, गृहनिर्माण क्षेत्र, शाश्वत विकास, मुंबईतील घरे अशा विविध मुद्यावर सरकार कसे अपयशी ठरले आहे याची चिरफाड मुंडे यांनी केली.
dhananjay_munde_
dhananjay_munde_

मुंबई  : राज्यभरात रथयात्रा काढायला तुम्ही स्वतःला  राजा समजता का, असा सवाल विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना  विधानपरिषदेत केला. अर्थसंकल्पावरील चर्चेत मुंडे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

मुंडे म्हणाले की, राज्यातील नोकऱ्यांमध्ये 72 हजार पदेच उपलब्ध नसतांना दोन वर्षात दीड लाख पदे भरण्याची घोषणा करुन सरकार बेरोजगारांची फसवणूक करीत आहे. राज्य दुष्काळात होरपळत आहे. त्याठिकाणी जावून शेतकऱ्यांना दिलासा दिला असता तर बरे वाटले असते मात्र हे न करता निवडणुकी अगोदर मुख्यमंत्री रथयात्रा काढणार आहेत. तुम्ही स्वतःला राजा समजता का? अशा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.

पुलवामा हल्ल्याचा निवडणूकीसाठी केलेला उपयोग, विविध पदांची भरती, जीएसटी, उद्योग, गृहनिर्माण क्षेत्र, शाश्वत विकास, मुंबईतील घरे अशा विविध मुद्यावर सरकार कसे अपयशी ठरले आहे याची चिरफाड मुंडे यांनी केली.

राज्याच्या अर्थसंकल्पातून लोकांचे भले झाले असते तर लोकसभेची निवडणूक तुम्ही अर्थसंकल्पातल्या निर्णयावर लढवली असती. शहीद सैनिकांच्या मृत्यूवर लढवली नसती. पुलवामातील शहीद सैनिकांच्या आणि बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केलेल्या जवानांच्या नावाने मते मागितली नसती. लोकसभेतील तुमचा विजय हा सरकारच्या कामगिरीवर नाही तर शहीद सैनिकांच्या कामगिरीचा विजय आहे असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त करु असे पाच वर्ष सांगत होतात. आजचा तुमचा शेवटचा अर्थसंकल्प आहे. तुमच्या सरकारची घटका आता भरली आहे. असे टीकास्त्र मुंडे यांनी सोडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com