ही निवडणुक माझ्यासाठी जीवन - मरणाची : धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी सायंकाळी परळीत पोचली. यावेळी धनंजय मुंडे यांनी भावनिक आवाहन करत विधानसभेला विजयी करण्याचे आवाहन केले.
NCP Rally in Parali Munde Kolhe Pawar
NCP Rally in Parali Munde Kolhe Pawar

परळी (जि. बीड) : आपल्याला विधानसभेला विजयी केले तर मतदार संघाची ताकद निर्माण करु. परळी मतदार संघाला विचारात घेतल्याशिवाय राज्याचे राजकारण होणार नाही.  ही निवडणुक आपल्या जीवन मरणाची असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सायंकाळी परळीत पोचली. यात्रेचे दुचाकी फेरीने यात्रेचे स्वागत करण्यात आले.   माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, डॉ. अमोल कोल्हे, बाबाजानी दुराणी, रुपाली चाकणकर, सतिष चव्हाण, विक्रम काळे, बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, राजेंद्र जगताप, संदीप क्षीरसागर, सरोजिनी हालगे, अमोल मिटकरी आदींच्या उपस्थितीत परळीत  सभा झाली . 

या  सभेत धनंजय मुंडे यांनी परळीकरांना भावनिक आवाहन करत पंकजा मुंडे यांच्यावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, " जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांचे परळी व अंबाजोगाई हे दोनच तालुके पिक विम्यातून कसे वगळले ?  दोन वेळा परळीकरांनी लेकीला आशिर्वाद दिले. तुमच्या सेवेत मी २४ वर्षांपासून असून लेकालाही एकदा आशिर्वाद द्या.  परळीकर यावेळी आशिर्वाद देण्यात कमी पडणार नाहीत असा मला विश्वास आहे . "

 धनंजय मुंडे पंकजा मुंडेंना उद्देशून म्हणाले, "  त्यांना दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचेही स्वप्न पुर्ण करता आले नाही. उपमुख्यमंत्री असताना परळीत पंचतारांकित वसाहत उभारण्यासाठी दिवंगत मुंडेंनी प्रयत्न केले. मात्र, शेतकऱ्यांच्या विरोधामुळे त्यावेळी ते शक्य झाले नाही. परंतु, सिरसाळात २२०० एकर जमिन उपलब्ध असल्याचे पत्र आपण उद्योगमंत्र्यांना दिले. त्यानंतर अधिकारी पाहणीसाठी आल्यानंतर आमच्या ताईंना लक्षात आले . त्यांची  अनेक उद्योगपतींशी ओळख आहेत. मग, परळीत एकही व्यवसाय का, आणला नाही ? " 

" आपण मात्र, सत्तेत नसताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यामुळे इथे सिमेंट आणि सोलार उद्योग आणला. आशिया खंडात नावलौकिक असलेला वैद्यनाथ कारखाना रसातळाला गेला. शेतकऱ्यांना अद्याप एफआरपीचे पैसे मिळाले  नाहीत," असा आरोपही त्यांनी केला. 

 आपले पंकजा मुंडेंशी वैयक्तीक भांडण नसून लोकांच्या हितासाठी संघर्ष आहे असे सांगून श्री. मुंडे शेवटी म्हणाले, " परळीकरांच्या प्रत्येक अडचणीत मी  धाऊन जातो, मग माझ्यात कमी काय?  ही निवडणुक माझ्यासाठी जीवन  मरणाची आहे . " 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com