धनंजय मुंडेंना नाशिकच्या सार्वजनिक वाचलनालयाचा  कार्यक्षम आमदार पुरस्कार   - Dhanajay Munde honoured with effective lawmaker award | Politics Marathi News - Sarkarnama

धनंजय मुंडेंना नाशिकच्या सार्वजनिक वाचलनालयाचा  कार्यक्षम आमदार पुरस्कार  

दत्ता देशमुख 
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची विरोधकांवर अभ्यासपूर्ण भाषणातून तुटून पडण्याची शैली आहे. त्यांचा यापूर्वी  विधिमंडळातील उत्कृष्ट अभ्यासु वक्ता म्हणुन गौरव झालेला आहे.

बीड : नाशिकच्या सार्वजनिक वाचलनालयातर्फे (सावाना) देण्यात येणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुुंडे यांना जाहीर झाला आहे.  चार मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदर शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

माजी आमदार व पत्रकार (कै.माधवराव लिमये) यांच्या स्मृतीनिमित्त मागील 16 वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो. या वर्षी या मनाच्या पुरस्कारासाठी धनंजय मुंडे यांची निवड करण्यात आली. यापुर्वी हा पुरस्कार बी. टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर. आर. पाटील, शोभाताई फडणवीस, जीवा पांडु गावित, दत्ताजी नलावडे, गिरीष बापट, सा. रे. पाटील,  पांडुरंग फुंडकर, जयवंतराव पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, बच्चु कडु, निलम गोर्‍हे, गिरीष महाजन यांना देण्यात आलेला आहे. 

 50 हजार रूपये रोख , स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून, कै.लिमये यांच्या कन्या शोभा नेर्लीकर, जावाई डॉ.विनायक नेर्लीकर यांच्या देणगीतून हा पुरस्कार दिला जातो. आमंदार हेमंत टकले, ज्येष्ट पत्रकार शैलेंद्र तनपुरे, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.विलास औरंगाबादकर, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, डॉ.नेर्लीकर दांम्पत्य यांच्या निवड समितीने श्री.मुंडे यांची यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड केली. 

चार मार्चला सायंकाळी सहा वाजता नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात या पुरस्काराचे वितरण होईल. 

 श्री.धनंजय मुंडे हे मागील 8 वर्षांपासून विधान परिषदेचे सदस्य म्हणुन काम पाहत आहेत, साडेचार वर्षांपासून  विरोधी पक्षनेते म्हणुन काम करताना त्यांनी सभागृहात शेतकरी, युवक, बेरोजगार, महिला, कष्टकरी व सामान्य नागरीकांच्या प्रश्‍नांवर  आवाज उठवण्याचे काम केले आहे. राज्यातील काही  मंत्र्यांची  भ्रष्टाचाराची  प्रकरणे सभागृहात पुराव्यानिशी मांडुन त्यांनी एक वेगळी छाप सभागृहात पाडली. एक  आक्रमक, अभ्यासु आमदार म्हणुन त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून,आहे .  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख