चंद्रकांतदादांची मोहीम फत्ते ? धनंजय महाडिक भाजपाच्या वाटेवर ?

येत्या सोमवारी किंवा पुढील आठवड्यात श्री. महाडिक हे राष्ट्रवादी सोडल्याची घोषणा करण्याची शक्‍यता आहे.
patil_mahadik
patil_mahadik

कोल्हापूर :  लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीसह कॉंग्रेसच्या नेत्यांनी सहकार्य न केल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक हेही भाजपात जाण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

यासंदर्भातील श्री. महाडिक यांच्या हालचालीही वाढल्या असून भाजपात पक्षातील मोठी जबाबदारी त्यांच्यावर देण्याचा 'शब्द' देण्यात असल्याचे समजते . 

लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी घ्यावी असा दबाव श्री. महाडिक यांच्यावर कुटुंबियांसह कार्यकर्त्यांकडून होता. प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र धोका होणार होता हे त्यांना माहिती होते आणि झालेही तसेच. त्यामुळे श्री. महाडिक हे नाराज आहेत.

 त्यातून पर्यायांचा शोध त्यांनी सुरू केला होता. ऑगष्टच्या पहिल्या आठवड्यातच त्यांनी याबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकरवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीतच त्यांचा भाजपा प्रवेश निश्‍चित झाला होता, तथापि जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे हा निर्णय लांबल्याचे सांगितले जाते. 

राज्यातील राष्ट्रवादीच्या अनेक आजी, माजी आमदार, खासदारांनी भाजपा किंवा शिवसेनेची वाट धरली आहे. पश्‍चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो, पण या भागातूनच साताराचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेकांनी भाजपात प्रवेश केला आहे. 

राष्ट्रवादीला राज्यात एकापेक्षा एक धक्के बसत असताना कोल्हापुरातील श्री. महाडिक हेही भाजपाच्या वाटेवर असल्याच्या शक्‍यतेने राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसण्याची शक्‍यता आहे. येत्या सोमवारी किंवा पुढील आठवड्यात श्री. महाडिक हे राष्ट्रवादी सोडल्याची घोषणा करण्याची शक्‍यता आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com