माझ्या आंदोलनात राजू शेट्टींनाही बोलवणार!

राजू शेट्टींच्या घरी जावून त्यांच्या आईचा आशिर्वाद घेणार आहे.
माझ्या आंदोलनात राजू शेट्टींनाही बोलवणार!

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेटटी यांना पराभूत करणारे खासदार धैर्यशील माने हे शेट्टी यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेणार आहेत. 

खासदार माने म्हणाले, वंचित आघाडी किंवा जातीच्या राजकारणाने शेट्टी यांचा पराभव झाल्याची आवई उठवली जात असली तरी त्यामध्ये काही तथ्य नाही. कारण याच जनतेने यापूर्वी शेटटी यांना मराठा उमेदवार असतानाही निवडून दिले आहे. मात्र शेटटी हे मतदारसंघातील लोकांचे प्रश्‍न सोडवण्यात अपयशी ठरल्याने मतदारांनी लोकप्रतिनिधी बदलण्याचा निर्णय घेतला, असेही नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी स्पष्ट केले. 

मी शेतकऱ्यांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात मी स्वतः असेनच पण साखर कारखानदारांनी उसाला दर दिला नाही तर माझ्या आंदोलनात राजू शेट्टींनाही बोलवणार आहे. मी पॉझिटीव्ह आहे. आता स्पर्धा संपली आहे. राजू शेट्टींच्या घरी जावून त्यांच्या आईचा आशिर्वाद घेणार आहे. विकासाच्या आणि वारणेच्या पाण्याच्या प्रश्‍नावर आम्ही राजकरण विरहीत समाजिक काम करणार असल्याचेही माने यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com