dhairysheek mane welcomes in kolhapur | Sarkarnama

धैर्यशील, कसली शंका ठेवता?: आदित्य ठाकरे 

सागर कुंभार
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

माने गट 'फुल्ल रिचार्ज'

कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने व त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी मुंबई येथे नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. यापार्श्वभुमीवर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी धैर्यशील माने यांच्या कोल्हापूर येथील घरी भेट दिली. 

या भेटीमुळे हाकणंगले लोकसभा मतदारसंघातील माने गट व शिवसैनिक 'फुल्ल रिचार्ज' झालेचे चित्र पहावयास मिळत आहे.

राष्ट्रवादीत माने गटाला गृहीत न धरण्याच्या धोरणामुळे माने पूर्णतः नाराज झाले होते. त्यातच शरद पवारांवर मिळेल त्या व्यासपीठावर नावे ठेवत ज्या खासदार राजू शेट्टींनी तोंडसुख घेतले त्यांनाच उमेदवारी देण्याचे संकेत पक्षातून सुरु आहेत. त्यामुळे शिवसेनेचे शिवधनुष्य माने कुंबियांनी उचलले आहे.    

दरम्यान, हातकणंगले  मतदारसंघ हा  शिवसेनेच्या हक्काचा मतदारसंघ असल्याने, येथील उमेदवार हा शिवसेनेचाच असणार आहे. तेव्हा धैर्यशील माने यांनी कोणतीही शंका न ठेवता कामाला लागावे, असे सांगताच कार्यकर्त्यांनी  जल्लोष व्यक्त केला. यावेळी धैर्यशील माने यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वतः कोल्हापूरी फेटा बांधत स्वागत केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख