डाॅ. राजेश देशमुख - जिल्हाधिकारी ते शेतकर्‍यांचा हिरो

यवतमाळ येथे शेतकर्‍यांना पीककर्ज न देणार्‍या राष्ट्रीयकृत बँकांना डाॅ. देशमुख यांनी ताळ्यावर आणले. फवारणीतून विषबाधा झाल्याने शेतकरी, शेतमजुरासाठी किटची व्यवस्था केली. शेतकर्‍यांना आत्मनिर्भर करण्यासाठी मागेल त्याला शेततळे, मत्सशेती, धडक सिंचन विहीर, रेशीम शेती, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, कृषीपंप वीजजोडणी,सर्वांसाठी घरे असे अनेक उपक्रम जिल्ह्यात राबवून एक अधिकारी अशी ओळख निर्माण करण्यापेक्षा 'शेतकर्‍यांचा हिरो' अशी बिरुदावली डॉ.राजेश देशमुख यांच्या नावापुढे लावली जात होती
DR. Rajesh Deshmukh Appointed District Collector of Pune
DR. Rajesh Deshmukh Appointed District Collector of Pune

यवतमाळ :  एखाद्या अधिकार्‍याने नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास त्यांचे चांगले परिणाम दिसतातच. याची प्रचिती सातारा तसेच यवतमाळ जिल्ह्यात दिसत आहे. सातारा सीईओ तसेच यवतमाळ येथे जिल्हाधिकारी असताना लोकाभिमुख कामगिरीमुळे डॉ. राजेश देशमुख यांच्यावर पुणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

यवतमाळ येथे शेतकर्‍यांना पीककर्ज न देणार्‍या राष्ट्रीयकृत बँकांना डाॅ. देशमुख यांनी ताळ्यावर आणले. फवारणीतून विषबाधा झाल्याने शेतकरी, शेतमजुरासाठी किटची व्यवस्था केली. शेतकर्‍यांना आत्मनिर्भर करण्यासाठी मागेल त्याला शेततळे, मत्सशेती, धडक सिंचन विहीर, रेशीम शेती, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, कृषीपंप वीजजोडणी,सर्वांसाठी घरे असे अनेक उपक्रम जिल्ह्यात राबवून एक अधिकारी अशी ओळख निर्माण करण्यापेक्षा 'शेतकर्‍यांचा हिरो' अशी बिरुदावली डॉ.राजेश देशमुख यांच्या नावापुढे लावली जात होती.

जिल्ह्यातील सतत दुष्काळ, त्यामुळे शेतकर्‍यांसमोर मोठी अडचण होती. ही अडचण लक्षात घेता तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अनेक योजना मिशन मोडवर घेतल्या. त्यात जलयुक्त शिवार अभियानापासून तर मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, धडक सिंचन विहीर कार्यक्रम, सर्वांसाठे घरे , राष्ट्रीय महामार्ग काम, यवतमाळ साठी वरदान असणार्‍या वर्ध-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी जमिन अधिग्रहण, आॅक्सीजन पार्क, शासकीय कामात सुटसुटीतपणा यावा यासाठी झीरो पेन्डन्सी आदी २० योजनांचा सहभाग होता. 

मागेल त्याला शेततळे, ही योजना मोहीमेवर घेण्यात आली होती. शेतकर्‍यांनीही पाण्याची अडचण लक्षात घेता सात हजार शेततळी निर्माण केली. त्यांचा परिणाम जिल्हातील जलपातळीवरुन दिसत आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत टंचाईचे चटके सोसणारा जिल्ह्या पाण्यात स्वयंपूर्ण झाला आहे. या ठिकाणी शेततळ्यात शेतकर्‍यांनी मत्सशेती केल्यास त्यांच्या उत्पन्नात अधिक भर पडेल, या दृष्टीने डाॅ. देशमुख यांनी मत्सशेतीला प्रोत्साहन दिले. 

९०० शेततळ्यांत मत्स्यशेतीचा प्रयोग

९०० शेततळ्यांत मत्स्यशेतीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. शेतकर्‍यांना जोड धंदा मिळाला. याशिवाय जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविले. पहिल्यांदाज शेतकर्‍यांनी पांरपारिक पिकांसोबत दोन हजार शेतकर्‍यांनी रेशीम शेती केल्याने अनेक शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ झाली. शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी १२ हजार धडक सिंचन विहीरीच्या कामांना त्यांनी गती दिली. काही कारणांनी रखडलेल्या विहीरीचा मार्ग मोकळा करुन देण्यात आला. 

घरकुल योजना 'मिशन मोड' वर घेऊन नोंदणी व इतर प्रक्रिया राबविण्यात आली. या सर्व योजनां प्रभावीपणे राबविल्याने जिल्ह्याचा डंका राज्यस्तरावर गाजला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शेतकर्‍यांच्या हिताच्या योजना 'मिशन मोडवर' घेतल्याने त्यांचे परिणाम जिल्ह्यात दिसून आले. शेततळ्यात मत्सशेतीचा अभिनव प्रयोग जिल्ह्यात करण्यात आला. या सर्व योजनाची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने जिल्ह्यातील चित्र बदलले असून राज्यस्तरावरही जिल्ह्याचा लौकीक वाढला होता. 

साताऱ्याचेही होते सीईओ

डॉ. राजेश देशमुख यांनी जून २०१६ मध्ये सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली. याठिकाणीही त्यांनी आपल्या कामातून छाप सोडली. जिल्ह्यात ६२ हजार शौचालये प्रलंबित होती. जिल्हा हागणदारीमुक्त करावा, असा निश्‍चय डॉ. देशमुख यांचा होता. त्यासाठी त्यांनी ही योजना मिशनमोडवर घेतली. योजनेचे गावनिहाय नियोजन करून अधिकारी, कर्मचार्‍यांना डिसेंबर २०१६ ची 'डेडलाईन' देण्यात आली होती. पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, गामस्थांची भेट घेऊन त्यांना डाॅ. देशमुख यांनी योजनेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने डिसेंबरपर्यंत ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण झाले. 

त्यामुळे त्यावेळी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात सातारा जिल्हा परिषदेचा गौरव करण्यात आला होता. सातारा येथून बदली झाल्यानंतर त्यांनी तयार केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी सुरू राहिली. त्याची फलश्रुती म्हणून सातारा जिल्हा परिषदेला स्वच्छतेत देशात पहिला येण्याचा बहुमान मिळाला.

दुष्काळग्रस्त भागात कार्य

माण, खटाव व कोरेगाव पूर्व हा भाग दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. डॉ. राजेश देशमुख यांच्या प्रयत्नामुळे त्या भागातील नागरिकांनी प्रतिसाद दिला. गुडमाॅर्निंग पथकांच्या माध्यमातून कारवाई, तर गवंडी प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली. 

अशा नियोजनातून देशपातळीवर सातारा जिल्हा परिषदेचे नाव पोहोचले होते. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात जिल्ह्यातील ७२ गावांचा कायापालट केला. गावात आरोग्य, शिक्षण, रोजगार तसेच पायाभूत विकासावर भर दिला. यासाठी खासगी व सार्वजनिक संस्था, उद्योग समूह व वित्तीय संस्था यांच्या सामाजिक दायित्व उपक्रमाच्या माध्यमातून गावांचा विकास साधण्यात आला. गावाच्या विकासासाठी ११० कोटीचा आराखडा तयार करण्यात आला होता. डिजिटल शाळा, शैक्षणिक स्तर, शाळाबाह्य मुले, बालविकास, बचतगट अशा अनेक आघाडीवर काम झाल्याने गावात सामाजिक परिवर्तन झाले.

यवतमाळ जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा झाल्याने तब्बल २२ शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. फवारणीतून एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना होती. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रभावी जनजागृती तसेच मोहीम राबविण्यात आली. त्याचाही परिणाम दिसून आला. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात एकही मृत्यू विषबाधाने झाला नाही. डाॅ. देशमुखांच्या कार्यपद्धतीचे हे यश आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com