कोरोनामुक्तीनंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा पुन्हा झंजावात - Co-operative Minister Balashabe Patil Active Again after Corona | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनामुक्तीनंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा पुन्हा झंजावात

सचिन शिंदे 
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

पालकमंत्री पाटील यांना १४ ऑगस्टला कोरोनाची लागण झाली. त्यावेळी त्यांच्यावर त्वरीत कृष्णा, नंतर मुंबईत ब्रीच कॅन्डी हॉस्पीटलला त्यांच्यावर उपचार झाले. त्यानंतर ते कोरोनामुक्त झाले. त्यानंतरचा क्वारंटाईन कालवधीही संपला. तीन दिवसापूर्वी ते प्रत्यक्ष कार्यरत झाले. गणेश विसर्जनादिवशीही त्यांच्या पायाला भिंगरी होती

कऱ्हाड : कोरोनामुक्तीनंतर पुर्वीचाच जोश कायम ठेवत सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुन्हा एकदा त्यांच्या कामाचा झंझावात कायम ठेवला. गणेश विसर्जना दिवशी पालकमंत्री पाटील यांनी दरवर्षीचा त्यांचा क्रम कोरोनाच्या काळातही कायम ठेवल्याने नागरीकांमध्ये चर्चा होती. 

या वर्षी अत्यंत साधेपणाने झालेल्या गणेश विसर्जनातही पालकमंत्री पाटील यांनी शहरातील मुख्य चौकांना भेटी देणे, पोलिस, पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करणे, मंडळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, काही मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी मुर्तीची आरतीही करणे, पालिका व पोलिसांनी राबवलेल्या उपक्रमाचीही पहाणी करणे असा त्यांचा दरवर्षीचा क्रम याही वर्षी त्यांनी कायम ठेवला. त्यामुळे कोरोनामुक्तीनंतरच्या त्यांच्या झंझावाताची शहरात चर्चा झाली.

पालकमंत्री पाटील यांना १४ ऑगस्टला कोरोनाची लागण झाली. त्यावेळी त्यांच्यावर त्वरीत कृष्णा, नंतर मुंबईत ब्रीच कॅन्डी हॉस्पीटलला त्यांच्यावर उपचार झाले. त्यानंतर ते कोरोनामुक्त झाले. त्यानंतरचा क्वारंटाईन कालवधीही संपला. तीन दिवसापूर्वी ते प्रत्यक्ष कार्यरत झाले. गणेश विसर्जनादिवशीही त्यांच्या पायाला भिंगरी होती. त्यादिवशी पालकमंत्री नात्याने त्यांनी विविध उपायांची माहिती घेतली. येथील गणेशोत्सवात पालकमंत्री पाटील नेहमीच नेहमी कार्यरत असतात. ते नेहमी स्वागत कक्षात बसून मंडळांना सुचनाही करतात. यावर्षी कोरोनामुळे उत्सवावर अनेक मर्यादा आल्या आहेत. त्याबाबत पालकमंत्री पाटील यांनाही त्याबाबत मंडळांना आवाहन केले होते. विसर्जानदिवशीही पालकमंत्री पाटील यांनी पालिका व पोलिस यांनी येथे उपाय केले आहेत. त्याचा माहिती घेतली. दुपारी ते थेट साताराला गेले. तेथे त्यांनी शासनाच्या होणाऱ्या जम्बो कोविड सेंटरची पहाणी केली.

सातारला पहाणी झाल्यानंतर पालकमंत्री थेट येथे सायंकाळी आले. त्यावेळी कऱ्हाडचा गणेशोत्सवात सामील झाले. यावेली येथे मंडळांचे विसर्जन सुरू होते. पालकमंत्री विसर्जनस्थिती पाहण्यासाठी आले. त्यावेळी ना डाम डौल, ना वाजंत्री मात्र भक्तीमय वातावरणात होते. त्याच वातावरणात उत्सव सुरू होता. त्याची पहाणीकरून पालकमंत्री पाटील थेट येथील कृष्णा घाटावर गेले. त्यांनी तेथील केलेल्या उपायांची माहिती घेतली. पालिका, पोलिस अधिकारी यांच्याशी चर्चा केली. तेथील विविध लोकांशीही बोलले. त्याचवेळी तेथे आलेल्या मंडळांशी त्यांनी चर्चा केली. काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्याशी संवाद साधला. काही मंडळांनी त्यांच्या हस्ते गणेश पूजन केले. तेथे आलेल्या येथील भोई गल्लीतील आदिमाया गणेश मंडळाची आरतीही पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते झाली. कोरोनामुक्त झाल्यांनंतर कोरोना योद्धा म्हणून कार्यरत झालेल्या पालकमंत्री पाटील यांचीच सर्वत्र चर्चा होती.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख