पिंपरी पालिका आयुक्तांचा २४ तासांत दुसरा दणका : दोन ठेकेदारांवर फौजदारी, काळ्या यादीत टाकले - PCMC commissioner Rajesh Patel orders criminal action against contractors | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

पिंपरी पालिका आयुक्तांचा २४ तासांत दुसरा दणका : दोन ठेकेदारांवर फौजदारी, काळ्या यादीत टाकले

उत्तम कुटे
शुक्रवार, 2 जुलै 2021

पालिकेला फसविण्याचा उद्योग पडला महागात 

पिंपरीः निविदा तथा टेंडरसाठीचा अनुभवाचा दाखला बनावट सादर केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका आय़ुक्त राजेश (PCMC commissioner IAS Rajesh Patil) पाटील यांनी आणखी शुक्रवारी (ता.२) आणखी दोन ठेकेदारांना दणका दिला. त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याविरुद्ध फौजदारीही करण्याचा आदेश त्यांनी दिला.

अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून पालिकेच्या सल्लागार पॅनेलवर नियुक्ती मिळवलेल्या कावेरी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंटच्या संतोष किरनळ्ळी या सल्लागाराला कालच (ता.१) आयुक्तांनी काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी कारवाईचा आदेश दिला आहे. त्यानंतर २४ तासांतच त्यांनी आणखी दोन ठेकेदारांची बनावटगिरी उजेडात आणून त्यांना दणका दिला. बनावट एफडीआर सादर करून पालिकेला लाखो रुपयांची गंडा घालणाऱ्या १८ कंत्राटदार तथा ठेकेदारांना त्यांनी आतापर्यंत तीन व चार वर्षे काळ्या यादीत टाकले आहे.त्यातील दहाजणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हेही आतापर्यंत दाखल केले आहेत.

बनावटगिरीव्दारे पालिकेची फसवणूक करणाऱ्या ताज्या घटनेत पाणीपुरवठ्याची कामे करणाऱ्या दोन ठेकेदारांवर संक्रात आली आहे. त्यांनी निविदेकरिता सादर केलेले अनुभव दाखले बनावट आढळले. त्याबाबत तक्रार आल्यानंतर केलेल्या छाननीत ती खोटी असल्याचे आढळताच आयुक्तांनी ही कारवाई केली. पिंपरीतील मे. राजेश इंजिनिअरिंग अॅन्ड कंपनीचे मालक रेवजी सहादू घाटगे आणि बिबवेवाडी,पुणे येथील संजीव प्रिसीजनचे संजीव यशवंत चिटणीस अशी खोटे अनुभव दाखल केलेल्या पाणीपुरवठा ठेकेदारांची  नावे आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख