Devyani Dongaonkar elected z. p. president | Sarkarnama

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदी  शिवसेनेच्या देवयानी डोणगावकर 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 21 मार्च 2017

औरंगाबाद: पंचायत समितीप्रमाणे जिल्हा परिषदेतही शिवसेना-कॉंग्रेस एकत्र आली असून आज झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या देवयानी डोणगावकर तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेसचे केशव तायडे हे विजयी झाले. दोघांना प्रत्येकी 34 मते पडली, तर भाजपच्या अध्यक्षपदासाठीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण, उपाध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश सोनावणे यांना प्रत्येकी 28 मते पडली. 

अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून चौघांची नावे चर्चेत होती. गंगापूर तालुक्‍यातून देवयानी डोणगावकर, पैठणमधून मनीषा सोलाट, कन्नडमधून शुभांगी काजे; तर वैजापूरमधून वैशाली पाटील यांनी अध्यक्षपदासाठी प्रयत्न केले होते. सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचे प्रयत्न सुरू होते. आमदार भुमरे आणि खासदार चंद्रकांत खैरे यांना शेवटी नमते घेत देवयानी डोणगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करावे लागले. 

डोणगावकर घराण्याची हॅट्ट्रिक 

डोणगावकर घराण्यात तिसऱ्यांदा जिल्हा परिषद अध्यक्षपद आले आहे. साहेबराव पाटील डोणगावकर हे 12 फेब्रुवारी 1979 ते 16 जून 1979 पर्यंत पाचवे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांना 20 जून 1979 ते 20 फेब्रुवारी 1980 या कालावधीत सहावे जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. आता त्यांची सून देवयानी डोणगावकर या जिल्हा परिषदेच्या 30 व्या अध्यक्षा ठरल्या आहेत. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख