मा.गो. वैद्य यांचे नातू देवळीतून लढणार ?

..
bjp_logo
bjp_logo

सेवाग्राम (जि. वर्धा) : देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघातून भाजपचे  माजा आमदार सुरेश वाघमारे आणि जिल्हाध्यक्ष राजेश बकाने या तगड्या उमेदवारांनी जनसंपर्क वाढवित दोंनदा संपर्क दोरा आटोपला. 


आता तिसऱ्या उमेदवाराने जनसंपर्क सुरु केल्याने आता भाजपचा उमेदवार नेमका कोण, असा प्रश्न पडला आहे. अशात राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे नातू विष्णुगुप्त श्रीनिवास वैद्य निवडणुक लढण्याची तयारी करीत असल्याची माहिती आहे.

विद्यमान आमदार कॉंग्रेसचे रणजित कांबळे याना शह देण्यासाठी भाजप सरसावली आहे. तर मागील निवडणुकीत  सुरेश वाघमारे यांचा केवळ 900 मतांनी पराभव झाला.  वाघमारेंनी यावेळी पुन्हा जनसंपर्क वाढविला आहे.


 तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने विकास कामाचे भुमीपूजन करीत उमेदवारी पक्की असल्याचे सांगत आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये गटबाजी उफळात असताना गटबाजी थोपविण्यासाठी विष्णुगुप्तांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असे राजकीय विश्‍लेषकांकडून सांगण्यात येते.

विष्णूगुप्तांना उमेदवारी जाहीर होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मा. गो. वैद्य हे मूळचे तरोडा येथील असून तरोडा जिल्हा परिषद मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला आहे. मागील निवडणूक अपवाद वगळता सतत या भागातून चारदा भाजपचा उमेदवार निवडून आला. विष्णूगुप्त वैद्य यांचे प्राथमीक शिक्षण तरोडा तेथे झाले आहे. तर नागपूर विद्यापीठात विद्यार्थ्यांचे नेतृत्व त्यांनी केले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नागपूर महानगर सहमंत्री म्हणून त्यांनी काम केलेले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com