आमदार घोलपांच्या देवळालीत सत्तेत शिवसेना, विरोधात भाजप! 

तीस वर्षाहून अधिक काळापासून देवळाली मतदारसंघात शिवसेना नेतेबबन घोलप यांच्या कुटुंबीयांकडे आमदारकी आहे. मात्र या कालावधीत महत्वाचे प्रश्‍न सोडविण्यात युतीतील शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांना सपशेल अपयश आल्याची टिका होत आहे. त्यामुळे सत्तेत शिवसेना व विरोधात भाजप अशी स्थिती झाली आहे.
आमदार घोलपांच्या देवळालीत सत्तेत शिवसेना, विरोधात भाजप! 

नाशिक - तीस वर्षाहून अधिक काळापासून देवळाली मतदारसंघात शिवसेना नेते बबन घोलप यांच्या कुटुंबीयांकडे आमदारकी आहे. मात्र या कालावधीत महत्वाचे प्रश्‍न सोडविण्यात युतीतील शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांना सपशेल अपयश आल्याची टिका होत आहे. त्यामुळे सत्तेत शिवसेना व विरोधात भाजप अशी स्थिती झाली आहे.

मतदारसंघातील एकलहरेचा 660 मेगावॅटचा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. शेजारी निफाडला कारखाना सुरु होऊन ड्रायपोर्ट उभा राहात आहे. येथे नाशिक साखर कारखाना बंद झाला आहे. नाशिकला काहीही प्रयत्न युतीच्या आमदार किंवा मंत्र्यांकडून झालेले नाही. नाशिक- पुणे महामार्गावर शिंदे गावात टोल नाका आहे. त्यावर शहरातील नागरिकांना टोल भरावा लागतो. दुसरीकडे निफाडला पिंपळगाव येथील टोल नाक्‍याला व शिंदे टोल नाक्‍याला वेगवेगळे न्याय कसे? याचे उत्तर युतीचे नेते देऊ शकलेले नाही. 

विरोधक प्रचारात कमी 
युती होउ नये ही शिवसेनेच्या मित्रपक्षाचे भाजपचे नगरसेवक पाण्यात देव ठेऊन आहेत. वंचित बहुजन आघाडीने बाळसे धरले आहे. पण प्रचारात मात्र, वंचित बहुजन आघाडी किंवा वंचित आघाडीचे इच्छूक कुठेही दिसत नाही. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात जी काही मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यात, भाजपचा विरोधाची जागा मिळविण्याचा प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादीचे लक्ष्मण मंडाले यांसह तीन ते चार इच्छुक आहेत. भाजपकडे नगरसेविका सरोज अहिरे, वंचित आघाडीचे पवन पवार उमेदवारी व प्रचारात आघाडीवर आहेत. त्यांचा सामान आमदार योगेश घोलप यांच्याशी होईल. ही लढत कशी रंगते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

यांचीच सत्ता, यांचाच कांगावा 
देशात- राज्यात सत्ता भाजप शिवसेना युतीची पण नागरी प्रश्‍नांवरुन याच पक्षांचा कांगवा असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळते. काम करायची नाही, उलट न होणाऱ्या कामाच या पक्षांनीच राजकारण तेवत ठेवण्याचे प्रकारही देवळाली मतदार संघातच अनुभवास येतात. भगूर येथील रेल्वेपूल त्याचे उत्तम उदाहरण आहे. केंद्रात सत्तेत असूनही पुलाचे काम होऊ शकलेले नाही. पूलाचे काम रोखून धरण्यात नगरपालिकेचा अडसर असल्याने व्यापाऱ्यांना आंदोलन करावे लागले. तेव्हा कुठले नगरपालिका हलली म्हणजे नगरपालिकेत सत्ता शिवसेनेची खासदार शिवसेनेचे पूल त्यांच्याच सरकारच्या काळातला आणि अडवणूकही त्यांनीच करायची असे सगळे भगूरच्या पूलाचे राजकारण रंगले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com