अजितदादांना प्रतिक्षा असलेला देवगिरी बंगला शरद पवारांना

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना देवगिरी हा नागपुरातील बंगला देण्याची प्रथा आहे.
sharad pawar gets devgiri residence
sharad pawar gets devgiri residence

नागपूर : उपमुख्यमंत्र्यांचे निवास असलेल्या देवगिरी राष्ट्रवादीचे प्रमुख खासदार शरद पवार दोन दिवस मुक्‍कामी राहणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली. त्यांच्या नावाने देवगिरी देण्यात आली आहे. मात्र, झोपण्यासाठी ते हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे जाणार असल्याचे कळते.

उपमुख्यमंत्र्यांचे निवास म्हणून देवगिरीची ओळख आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 झाली. मात्र, 1978 ला प्रथम उपमुख्यमंत्रिपदाची निर्मिती करण्यात आली. नाशिकराव तिरपुडे पहिले उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. त्याच वर्षात सत्तांतर झाले. शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि सुंदरराव सोलंके उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर गोविंदराव आदिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर. आर. पाटील, छगन भुजबळ, अजित पवार उपमुख्यमंत्री झाले.

फडणवीस सरकारच्या काळात उपमुख्यमंत्रिपद कुणालाच देण्यात आले नाही. मात्र, सरकारमध्ये पहिल्या वर्षी हे निवास रिक्त ठेवण्यात आल्यानंतर दुसऱ्या वर्षी नंबर दोन मंत्री एकनाथ खडसे यांना हे निवास वाटप करण्यात आले. एकनाथ खडसेंना मंत्रिपदावरून हटविण्यात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांना हा मान देण्यात आला. आता शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाविकास आघाडी सत्तेत आहे. उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप उपमुख्यमंत्रिपदी कुणाचीही निवड करण्यात आली नाही. त्यामुळे `देवगिरी` रिक्तच ठेवण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांच्या राहण्याची व्यवस्था रविभवन येथेच करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख खासदार शरद पवार दोन दिवस उपराजधानीत मुक्कामी आहेत. त्यांना दोन दिवसांकरिता देवगिरी देण्यात आली आहे. दोन दिवसांनंतर हे निवास पुन्हा रिक्त राहणार असल्याची माहिती आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com