फेल गनिमी काव्याचे नायक अजित पवार! 

स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या पवार यांनी वारंवार जातीचा उल्लेख अडून-अडून केला.
devendra fadavnis on ajit pawar role
devendra fadavnis on ajit pawar role

पुणे : सत्ता स्थापनेच्या नाट्यात आमचा सर्वाधिक अपेक्षाभंग उद्धव ठाकरे यांच्याकडून झाल्याची भावना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली. कॉंग्रेसबरोबर जात शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गुंडाळून ठेवले, अशी टीका फडणवीस यांनी केली. विशिष्ट परिस्थितीत अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केले. या फेल गनिमी काव्याचे नायक अजित पवार होते, असे फडणवीस यांनी सांगितले. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी राज्यातील ठाकरे सरकार तसेच भाजपात सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोप व नाराजीनाट्यावर सविस्तर उत्तरे दिली. 

शिवसेना आमच्याबरोबर राहील असे आम्हाला शेवटपर्यंत वाटत होते. मात्र, विचाराला तिलांजली देत शिवसेनेने कॉंग्रेसबरोबर जवळीक केली. अजित पवार स्वत:हून आमच्याकडे आले. आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र त्यांनी दिले. शरद पवार यांच्याशी बोलल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन केले. अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत माझ्यासमोर कधीच बोलणे झाले नव्हते, असे त्यांनी सांगितले. 

ज्येष्ठ नेते शरद पवार अडून-अडून माझ्या जातीचा उल्लेख वारंवार करत असल्याने गेल्या पाच वर्षात मी राज्यातला मोठा नेता झाल्यासारखे वाटत आहे. मात्र, स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या पवार यांनी वारंवार जातीचा उल्लेख अडून-अडून केला. राजकारण काहीही असले तरी पवार ज्येष्ठ नेते आहेत. राजकीय मतभेद असतील. मात्र शत्रूत्व कुणाशीच नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com