मंत्र्यांना वाचवून अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस

मंत्र्यांना वाचवून अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस

नागपुर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अँटी करप्शन ब्युरोचे डायरेक्‍टर जनरल परमवीर सिंग यांनी सिंचन घोटाळ्याप्रकरणी सादर केलेले शपथपत्र म्हणजे मंत्र्यांना वाचून अधिकाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. डीजे परमवीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज सादर केलेल्या शपथपत्रात मध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी क्‍लीन चिट दिलेली आहे. 
2018 मध्ये दाखल केलेल्या शपथ पत्रातील माहिती कशी खोटी आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न आज सादर केलेल्या शपथपत्रात मध्ये करण्यात आला. परंतु 2018 मध्ये दिलेली माहिती खोटी आहे, याचे कुठलेही पुरावे शपथपत्रामध्ये नाहीत. हे दिशाभूल करणारे शपथपत्र उच्च न्यायालय स्वीकारणार नाही, असे आम्हाला वाटत असल्याचेही फडणवीस म्हणाले. 
परमवीर सिंग यांनी अतिशय त्रोटक शपथपत्र सादर केले आहे. या प्रकाराला आमचा तीव्र विरोध आहे. सभागृहात हा मुद्दा आम्ही उपस्थित करणार आहोत, पण मर्यादित स्वरूपात. कारण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर फार भाष्य करता येणार नाही. त्यामुळे सभागृहात या प्रकरणी आम्ही आमच्या मर्यादा पाळणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com