कॉंग्रेसने आता माझ्या विरोधात लढायला 'हा' भगोडा आणला आहे  :  फडणवीस

..
Deshmukh_CM
Deshmukh_CM

नागपूर : लोकसभेला नितीन गडकरींच्या विरोधात 'त्या' भगोड्याला आणले आणि आता माझ्या विरोधात लढायला 'हा' भगोडा आणला आहे. आमच्या विरोधात मैदानात उतरविण्यासाठी कॉंग्रेसला "भगोडे'च सापडतात काय, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी नाना पटोले आणि डॉ. आशिष देशमुख यांचे नाव न घेता केला.

श्री. फडणवीस म्हणाले , दक्षिण-पश्‍चिम या त्यांच्याच मतदारसंघातील टिंबर मार्केट परीसरात आयोचित प्रचारसभेत ते बोलत होते. या निवडणुकीत राहुल गांधी कुठे आहेत, दिसले नाहीत. ते महाराष्ट्रात नाहीत, हरीयाणातही नाही दिसले. मग मला वाटल दिल्लीत असतील. पण तेथेही नव्हते. मग कळल की ते बॅंकॉकला सुट्या घालवताहेत. कारण एव्हाना त्यांनाही चांगल कळुन चुकले आहे की, आता प्रचारासाठी फिरुनही काही उपयोग नाही. आपण जिंकू शकणार नाही. 

श्री. फडणवीस पुढे म्हणाले, सलमान खुर्शीद यांनी त्यांना येण्याची साद घातल्यावर कसेतरी दोन-तीन सभा ठरविल्या. येवढी कॉंग्रेस हताश झाली आहे. लढण्याआधीच हरलेली ही कॉंग्रेस आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तर यापेक्षाही खराब स्थिती झाली आहे . 

 आतापर्यंत मी चार वेळा आमदार झालो. 2014 मध्ये जेव्हा आमदार म्हणून निवडून तुम्ही निवडून दिले. त्यानंतर मुख्यमंत्री झालो आणि खऱ्या अर्थान लोकसेवेचे काम गेल्या पाच वर्षात केले. गेल्या 25 वर्षांत जेवढा पैसा नागपुरसाठी नाही मिळाला, तेवढा 5 वर्षात नागपुरसाठी आणून विकास काय असतो हे दाखवून दिले. मिहानमध्ये साडेतेरा हजार कोटींची गुंतवणूक झाली आणि पुढील काळात एक लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचे यावेळी फडणविस यांनी सांगितले.

व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी खासदार प्रकाश जाधव, बरिएमंच्या ऍड. सुलेखा कुंभारे, रिपाइंचे (आठवले) भूपेश थूलकर, अविनाश ठाकरे, मुन्ना यादव, अर्चना डेहनकर, प्रमोद चिखले यांच्यासह नगरसेवक व मनपातील तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com