शरद पवार मनाने हरले आहेत - देवेंद्र फडणवीस

शरद पवार मनाने हरले आहेत - देवेंद्र फडणवीस

पाथरी : देशात मोदीची विकास कामे पाहून राष्ट्रवादी कॉग्रेसचे कॅप्टन असलेल्या शरद पवारांनी निवडणुकीतून निवृत्ती जाहिर केली. शरद पवारांचे मन मोदी लाटेसमोर हरले आहे, हरलेल्या मनाने कोणीही जिंकू शकत नाही असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाथरी (जि.परभणी) येथील जाहीर सभेत लगावला. परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेना - भाजप महायुतीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी पाथरी येथे आले होते. 

व्यासपीठावर पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, उमेदवार खासदार संजय जाधव, परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, पाथरीचे आमदार मोहन फड, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार ऍड. विजय गव्हाणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, परभणी महानगराध्यक्ष आनंद भरोसे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, भाजप नेत्या मेघना बोर्डीकर, विठ्ठलराव रबदडे, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख राम पाटील, राजश्री जामगे, पी. डी. पाटील, शशिकांत देशपांडे, रवींद्र धर्मे, उद्धव नाईक आदींची उपस्थिती होती. 

दोन्ही कॉंग्रेस पाकिस्तानशी चर्चा व कलम 124 (अ) रद्द करण्याची भाषा त्यांच्या जाहीरनाम्यातून करत आहेत, त्यांना लाज वाटली पाहिजे, हा त्यांचा जाहीरनामा आहे की 'जैश ए मोहम्मदचा जाहीरनामा आहे ? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. कॉग्रेस गेल्या 50 वर्षापासून देशातील गरीबी हटावची आश्वासने देत आहेत. राहुल गांधी हे देखील हीच भाषा बोलत आहेत. गांधी घराण्यातील तीन पिढ्या पंतप्रधान पदावर विराजमान होत्या तरी देशातील ते गरीबी हाटवू शकले नाहीत. यांनी गरिबी नाहीतर स्वतःची व त्यांच्या चेल्या चपाट्याची गरिबी हटवायचे काम केले अशी टीका त्यांनी केली. 

मोदी सरकारने मागील साडेचार वर्षाच्या काळात रस्ते विकास, घरकुल, गॅस, शौचालय, मुद्रालोन व आयुष्यमान भारत योजनांच्या माध्यमातून देशातील गोर गरीब जनतेच्या समस्या सोडविण्याचे काम केले आहे. भविष्यात जल मंत्रालय योजनेतंर्गत नदीजोड प्रकल्प व वॉटर ग्रिडच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्याचे काम हाती घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधीच्या भाषणाची खिल्ली उडवत ते म्हणाले. राहुल गांधीचे भाषण म्हणजे मनोरंजनाचा भाग बनला आहे. काही दिवसानंतर टीव्हीवाले राहुल गांधीच्या भाषणाच्या आगोदर सुचना प्रदर्शित करतील हे भाषण काल्पनिक आहे त्याचा वास्तविकतेशी कसला ही संबंध नाही असे म्हणताच सभेस जमलेल्या नागरीकांमध्ये हशा पिकला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com