devendra phadnavis and metro | Sarkarnama

भाजपच्या काळात पाच वर्षात 1 कोटी प्रवाशांसाठी वाहतूक सुविधा - देवेंद्र फडणवीस

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मुंबई : देशात गेल्या वर्षात 70 लाख प्रवाशांसाठी विविध वाहतुक सुविधा केल्या गेल्या पण भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात आमच्या सरकारने पाच वर्षात 1 कोटी प्रवाशांची वाहतूक करू शकेल अशा वाहतुक सुविधा तयार करण्याचा संकल्प केला आहे, त्यासाठी मेट्रो रेल्वे आणि मोनो रेल तसेच एलव्हेटेड उपनगरी रेल्वे उभारली जात असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आज मुंबईत मेट्रोच्या पाचव्या मार्गाचे भूमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दहिसर मीरा भाईंदर या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचेही भूमीपुजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. 

मेट्रोच्या मार्गाचे भूमीपुजन करण्याच्या कार्यक्रमात फडणवीस यांनी राज्य सरकार मुंबईत कशा वेगवेगळ्या प्रकारे वाहतूक सुविधा उपलब्ध करून देत आहे त्याबद्दल माहिती दिली. भिवंडी आणि कल्याण मेट्रोच्या मार्गत आले याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, मेट्रो आणि रेल्वे आणि बस स्टेशनच्या परिसरात राज्य सरकार घरांची उभारणी करत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत असलेल्या सामान्य माणसाला घरे उपलब्ध करून देण्याच्या स्वप्नांचा पाठपुरावा आम्ही करत आहोत. तसेच आम्ही वेगाने सर्व कामे करत आहोत. याच समारंभात त्यांनी तळोजा आणि वसईपर्यंत मेट्रो नेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देत असल्याची घोषणा केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख