devendra phadanvis and centeral fund transfer | Sarkarnama

कुठलाही निधी केंद्राकडे परत पाठवलेला नाही - देवेंद्र फडणवीस

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 2 डिसेंबर 2019

मुंबई : केंद्राकडे माझ्या चार दिवसाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कुठलाही निधी परत पाठवलेला नाही असा निधी थेट येत नसतो आणि अशाप्रकारे निधी थेट परत पाठवता येत नाही असा खुलासा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्रफडणवीस यांनी केला आहे. 

कर्नाटकचे भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या चार दिवसाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात असा मोठा निधी हस्तांतर केल्याचा दावा केला होता. भाजपच्याच खासदाराने असा दावा केल्याने सोशल मिडीया अनेक पोस्ट फिरत होत्या. राजकीय क्षेत्रात याचीच चर्चा होत होती. मात्र आज फडणवीस यांनी स्पष्ट खुलासा करून आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, व्हॉट्‌सऍपवरवरील पोस्टवर विश्‍वास ठेवू नये असेही आवाहन केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख