"ई' स्कुटरवरून देवेंद्र फडणवीस परभणीच्या सभास्थळी दाखल ...

ई स्कुटरच्या दालनाची माहिती घेतांना देवेंद्र फडणवीस यांनी स्कुटर चालविण्याची इच्छा व्यक्त केली. महोत्सवाचे आयोजक आनंद भरोसे यांनी तातडीने तेथील एक स्कुटर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हजर केली. फडणवीस हे या स्कुटरवर बसून व्यासपीठापर्यत आले. राज्याचा विरोधी पक्षनेता स्कुटरवर बसून सभास्थळी आल्याचे पाहून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला.
 "ई' स्कुटरवरून देवेंद्र फडणवीस परभणीच्या सभास्थळी दाखल ...

परभणी : परभणीमध्ये आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाच्या उदघाटनासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कृषी महोत्सवात आलेली इ स्कुटर चालवत सभास्थळी येऊन उपस्थितांना आश्‍चर्याचा धक्का दिला.

ऍड. शेषरावजी धोंडजी भरोसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संजीवनी एज्युकेशन सोसायटी,आनंद शिक्षण प्रसारक मंडळ व संजीवनी मित्र मंडळ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन कृषी संजीवनी महोत्सवाचे उदघाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.7) झाले. यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.अशोक ढवन, आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, माजी आमदार विजय गव्हाणे, संघटन मंत्री भाऊराव देशमुख, संयोजक भाजपाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे आदींची उपस्थिती होती. 

कृषी महोत्सव स्थळी आल्यानंतर सुरुवातीस त्यांनी महोत्सवात लागलेल्या विविध दालनाची पाहाणी केली. त्यात ई स्कुटरचे दालनही होते. या ई स्कुटरच्या दालनाची माहिती घेतांना देवेंद्र फडणवीस यांनी स्कुटर चालविण्याची इच्छा व्यक्त केली. महोत्सवाचे आयोजक आनंद भरोसे यांनी तातडीने तेथील एक स्कुटर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हजर केली. फडणवीस हे या स्कुटरवर बसून व्यासपीठापर्यत आले. राज्याचा विरोधी पक्षनेता स्कुटरवर बसून सभास्थळी आल्याचे पाहून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com