सांगा कसं लढायचं? स्वबळावर का एकत्र? फडणवीस ,चंद्रकांतदादा दिल्लीकडे रवाना

शिवसेनेने किमान 135 जागांसाठी धरलेला आग्रह मान्य करायचा काय आणि कोथरूड ,सोलापूर ,धुळे अशा खास भाजपमय विधानसभा जागांची केलेली मागणी विचारात घ्यायची काय, याबददलचा अंतिम निर्णय जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आज दिल्लीत खलबते करणार आहेत. उदधव ठाकरे नेहमीप्रमाणे 'हार्ड बार्गेन' करत असल्याने नक्‍की काय करायचे ते ठरवण्यासाठी आज दिल्लीत भाजप चर्चा करेल.
Devendra Fadanavis and Chandrakant Patil
Devendra Fadanavis and Chandrakant Patil

मुंबई : शिवसेनेने किमान 135 जागांसाठी धरलेला आग्रह मान्य करायचा काय आणि कोथरूड ,सोलापूर ,धुळे अशा खास भाजपमय विधानसभा जागांची केलेली मागणी विचारात घ्यायची काय, याबददलचा अंतिम निर्णय जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आज दिल्लीत खलबते करणार आहेत. उदधव ठाकरे नेहमीप्रमाणे 'हार्ड बार्गेन' करत असल्याने नक्‍की काय करायचे ते ठरवण्यासाठी आज दिल्लीत भाजप चर्चा करेल.

लोकसभा निवडणुकीपूर्वीही चौकीदार चोर है, असे पंढरपूरच्या सभेत जाहीरपणे बोलून उदधव ठाकरेंनी जागा वाढवून घेतल्या होत्या.आताही त्यांचा आग्रह मानायचा काय ते पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या सुचनेनुसार ठरवण्यात येणार आहे. सेना भाजप स्वबळावर लढण्यास सिध्द असल्याचा परिणाम शिवसेनेवर होईल आणि जागांची मागणी व्यवहार्य आकडयांवर स्थिरावेल अशी अटकळ भाजपत बांधण्यात येते आहे. महाराष्ट्रात बरोबरीचे स्थान हवे हा सेनेचा आग्रह, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचे अवास्तव अंदाज यामुळे संपूर्ण दिवस चर्चा करूनही सेना समजूतदार भूमिका घेत नसल्याचे भाजपचे मत झाले आहे.

135 चा आग्रह मान्य केला तर सेनेकडे निवडून येणारी मंडळी अन यंत्रणा नाही, असेही भाजपचे मत आहे. त्यामुळे सेनेने 110 ते 117 या आकडयात समाधान मानावे, असे राज्यातील भाजप नेत्यांना वाटते. सेनेला हे समजावून सांगितले असले, तरी त्यांनी 135 या आकडयावरून माघार घेतलेली नाही. किमान 130 तरी जागा हव्यात असे त्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत काय करावे ते केंद्रीय नेत्यांशी बोलूनच ठरवले जाणार असल्याने दोन्ही नेते आज दिल्लीत गेल्याचे समजते. सेनेला आता काही दिवसांचा अल्टीमेटम दयावा काय यावरही विचार सुरू आहे.

सेनेत गणित आत्मसन्मानाचे
शिवसेनेने युती हवी अशी भूमिका घेतानाच आत्मसन्मानाचे भान ठेवायचे असे ठरवले आहे. मागणी करताना पक्ष महाराष्ट्रात सर्वदूर असायला हवा असे पक्षाचे मत आहे. युतीत 120 जागा मिळाल्या तर 80 आमदार निवडून येतील. युती झाली नाही तरी शिवसेनेचे आमदार 50 आमदार येवू शकतात, असा अंदाज त्यांच्या पक्षात व्यक्‍त केला जातो आहे. त्यामुळे नंतर काय करायचे ते पाहू, असे सेनेत सांगितले जाते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com