बाळासाहेबांनी स्वाभिमान जपण्याचा मंत्र दिला : फडणविसांचा शिवसेनेला टोमणा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नमन करण्यासाठी आजहजारो नागरिक आणि शिवाजीपार्कवर जमणार आहेत
बाळासाहेबांनी स्वाभिमान जपण्याचा मंत्र दिला : फडणविसांचा शिवसेनेला टोमणा

मुंबई ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन असून शिवाजीपार्क येथील कार्यक्रमात दोन्ही कॉंग्रेसचे नेतेही बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत. नव्या राजकीय समीकरणांचा प्रभाव या दिनावर दिसून येत आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध सत्तास्थापनेवरून तुटले असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानिमित्ताने शिवसेनेला टोला लगावण्याची संधी सोडली नाही.

स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला, अशा शब्दांत फडणवीस यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. अर्थात स्वाभिमानाचा मुद्दा त्यांनी उपस्थित करून शिवसेना ही काॅंग्रेससोबत तडजोड करत असल्याबद्दल टोमणा मारला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून लाखो शिवसैनिकांची गर्दी शिवतीर्थावर उसळणार आहे. शिवसेनाप्रमुखांना नमन करण्यासाठी उद्या शिवाजी पार्क इथे शिवसैनिक जमलेले आपल्याला पाहायला मिळतील.

दरम्यान, रविवारी एनडीएने घटकपक्षांची बैठक बोलावली. मात्र, या बैठकीला शिवसेनेचे नेते सहभागी होणार नाहीत. कारण सगळे शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर जमणार आहेत. यावेळी बदललेल्या राजकीय समीकरणामुळे दोन्ही कॉंंग्रेसचे काही नेतेही उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


अशी आहे जय्यत तयारी :

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नमन करण्यासाठी आज हजारो नागरिक आणि शिवाजीपार्कवर जमणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी सध्या रंगरंगोटी आणि इतर व्यवस्था केली जाते. उद्या या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. पदाधिकारी आणि आमदारांसाठी एक वेगळे गेट असणार आहे. याचबरोबर मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिक देखील या ठिकाणी येणार असल्याने त्यांच्यासाठी दोन वेगळ्या गेट्‌सची सुविधा करण्यात आली आहे. राज्यात महाशिवआघाडी लवकरात लवकर सरकार स्थापन करणार आहे. अशात उद्या शिवसेनेव्यतिरिक्त राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे अनेक मोठे नेते हे शिवाजीपा र्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस नमन करण्यास येण्याची शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com