devendra fadnvis, mubai | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

""आभाळ फाटलय, पण आम्ही  शिवल्याशिवाय राहणार नाही'' 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 27 जून 2017

मुंबई : राज्यात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी त्या कर्जमाफीसाठी पैसे उभे करण्यासाठी निर्माण झालेल्या अडचणींवर आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ''राज्यावर आभाळ फाटलय पण आम्ही ते शिवल्याशिवाय राहणार नाही'' असे विधान फडणवीस यांनी आज येथे केले. 

मुंबई : राज्यात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी त्या कर्जमाफीसाठी पैसे उभे करण्यासाठी निर्माण झालेल्या अडचणींवर आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ''राज्यावर आभाळ फाटलय पण आम्ही ते शिवल्याशिवाय राहणार नाही'' असे विधान फडणवीस यांनी आज येथे केले. 

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा दिल्याबद्दल औरंगाबाद आणि इतर जिह्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा सह्याद्रीवर जाहीर सत्कार केला.त्यावेळी ते बोलत होते. 
मुख्यमंत्री म्हणाले,"" वारंवार कर्ज माफी मागण्याची वेळ आपल्यावर येऊ नये असे शेतकऱ्यांना ही वाटते. त्यासाठी आम्हाला उपाययोजना करायच्या आहेत. त्यामुळेच अडचणीतल्या शेतकऱ्यांना मदत केली. पण, नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यानाही मदत केली. इतर राज्यांनी अस केलं नाही. कर्जमाफीनंतर 34 हजार कोटी कुठून आणायचे हे आव्हान आहे. पण, शेतीतली गुंतवणूक कमी पडू न देण्याच आव्हान आहे. 

कर्जमाफीचा परिणाम विकासकामे आणि शेतीच्या गुंतवणुकीवर होणार नाही. 15 हजार कोटींच्यावर खर्च करू नका अस वित्त विभागाने म्हटले होते. परंतु, आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतला. शेतकऱ्यांचा विकास व्हावा म्हणून शेतीसाठी सोलार फिडर आणणार असून त्याची राळेगणसिद्धी येथून सुरुवात होईल. त्यामूळे राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना वीज कमी दरात मिळू शकेल. त्याचप्रमाणे समृद्धी महामार्गाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होणार आहे. समस्या संपणार नाही पण पर्याय शोधत जाऊ आणि त्यातून राज्याचा विकास करू असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख