amarsinh_pandit_
amarsinh_pandit_

संयमाने  राजकारण करा; फडणविसांचा पंडितांना सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपल्याने त्यांना बुधवारी निरोप देण्यात आला. यावेळी अनेकांनी त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या.

बीड : "अमरसिंह पंडित एकटे विधानपरिषद सभागृह बंद पाडण्याची ताकद ठेवतात, विरोधी पक्षात त्यांची नक्की उणीव जाणवेल. मात्र, भविष्यात त्यांनी संघर्ष थांबवून संयमाने स्थिर राजकारण करावे," अशी  भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आमदार अमरसिंह पंडित यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर बुधवारी त्यांना निरोप देण्यात आला. त्यांच्यासह इतर ११ सदस्यांनाही निरोप देण्यात आला. यावेळी अनेकांनी आमदार अमरसिंह पंडित यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. 

अमरसिंह पंडित माझे जवळचे मित्र असून त्यांनी विविध संस्थाच्या माध्यमातून मोठे सामाजिक काम केले आहे. सभागृहात अतिशय आक्रमक होऊन विविध प्रश्नांवर एकट्याने सभागृह बंद पडण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती, त्यांनी आता संघर्ष थांबून संयमाने स्थिर राजकारण करावे अशी कोपरखळी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारली. विरोधी पक्षाला त्यांची नक्की उणीव भासेल असेही फडणवीस म्हणाले. 


जिल्ह्याच्या राजकारणातील संघर्षशील नेतृत्व असल्याचे सांगून देशाच्या संसदेत काम करण्यासाठी त्यांना शुभेच्छा असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले. मराठवाड्याचे सिंचन, हक्काचे १८.३३ ‘टीएमसी’ पाणी असे शेतीविषयक प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडल्याचे श्री. मुंडे म्हणाले.  

पांढरे कोड असलेल्या व्यक्तींचा मुद्दा आठ वेळा सभागृहात मांडून जिल्ह्यातील पांढरे कोड असलेल्या व्यक्तींना अनुदान मंजूर करून घेतल्याचेही श्री. मुंडे यांनी नमूद केले. आमदार पंडित यांच्या मार्गदर्शन व सहकार्य याची उणीव भासेल. संसदेत सुनील तटकरे यांचे बरोबर काम करण्यासाठी त्यांनी यावेळी शुभेच्छादिल्या.

अमरसिंह पंडित मराठवाड्याचा आवाज होता अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केली. चांगला मित्र निवृत्त होत असल्याचे दु:ख असल्याचे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट म्हणाले. उपसभापती माणिकराव ठाकरे, सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह इतर नेत्यांनीही पंडित यांच्या कामांचा उहापोह केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com