Devendra Fadnavis Uddhav Thackray Shiv Sena | Sarkarnama

शिवसेनेच्या मनधरणीसाठी 'वर्षा'वर खलबते 

गोविंद तुपे
शनिवार, 4 मार्च 2017

मुंबई : मित्रपक्ष असलेल्या भाजपाकडून मिळणाऱ्या दुय्यम वागणूकीमुळे शिवसेनेचा स्वाभिमान दुखवला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आरपारची लढाई सुरू केली आहे. त्यातच शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष भाजपविरोधात एकत्र येण्याची शक्‍यता दिसू लागल्याने भाजपच्या पायाखालील वाळू सरकायला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या फोनला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नसल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे निवडणुकांचा गड जिंकणाऱ्या फडणवीस यांना तडजोडीच्या राजकारणात मात्र हार पत्करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. 

आक्रमक झालेली शिवसेना, मुख्यमंत्र्यावरील उडालेला विश्‍वास यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने सरकार पाडण्यासाठी शिवसेनेकडून सुरू झालेल्या चाचपणीमुळे भाजप नेते चिंतेत आहेत. उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेशी सलोख्याचे संबध असलेले सुधीर मुनगंटीवर आणि चंद्रकांत पाटील यांना वर्षा बंगल्यावर पाचारण करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यासोबत सेनेचे फाटलेले संबध दुरूस्त करण्याची जबाबदारी या दोन नेत्यांवर देण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा गड जिंकणारे फडणवीस तडजोडीच्या राजकारणात मात्र मागे पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

राज्यात सत्तेत आल्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजप नंबर एकचा पक्ष बनला आहे. मात्र 25 वर्षाच्या शिवसेना-भाजप युतीत कमालीची कटूता निर्माण झाली आहे. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला सरकारमध्येही आणि निवडणूक प्रचारतही दुय्यम वागणूक देण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोक गाठल्याचे राजकीय विश्‍लेषक सांगत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. मुंबईच्या महापौर निवडीच्या भाजपच्या प्रस्तावाकडे सेनेने ढुंकूनही पाहिले नसल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या फोनलाही उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नसल्याची सुत्रांची माहिती आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख