_Fadnavis_Patil
_Fadnavis_Patil

दादा, तुमच्यासारख्या सहकाऱ्यांमुळेच माझ्या चेहऱ्यावर हास्य  : देवेंद्र फडणवीस 

महाराष्ट्रातील जनतेसमोर आपण महायुती साठी मते मागितली आणि जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलेले आहे . त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे . कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका . -देवेंद्र फडणवीस

मुंबईः कठीण परिस्थितीत तुमच्यासारखे सहकारी माझे चिलखत बनुन समोर उभे राहतात . त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर हास्य कायम असते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे बोलताना सांगितले . भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली तेंव्हा  ते बोलत होते. 


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये कोणत्याही प्रसंगात देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर हास्य कायम असते असे विधान केले होते.  त्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  तुमच्यासारखी सहकारी हे कठीण प्रसंगात माझ्यासमोर चिलखत सारखे उभे राहतात, त्यामुळे मला कुठली काळजी नसते आणि त्यामुळेच माझ्या चेहऱ्यावर हास्य असते. 


महाराष्ट्रातील जनतेसमोर आपण महायुती साठी मते मागितली आणि जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलेले आहे . त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे . कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका . चर्चा करून विश्वास ठेवू नका.  काळजी करू नका . महाराष्ट्रामध्ये महायुतीचे उत्तम सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहे, असे श्री. फडणवीस यावेळी म्हणाले. 


देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आमदारांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानताना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे आभार मानले . श्री देवेंद्र फडणवीसम्हणाले,  भाजप ,शिवसेना  आणि मित्रपक्षांच्या महायुतीचा हा अभूतपूर्व विजय आहे . 1995 पासून कोणत्याही पक्षाला 77 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात मिळालेले नाहीत . मात्र 2014 आणि 2019 असे लागोपाठ दोन वेळा भाजप आणि मित्रपक्षांनी 100 पेक्षा जास्त जागा जिंकलेल्या आहेत .  


राज्य सरकार स्थापन झाल्याबरोबर अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत करू, असे सांगून देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आपला महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे आव्हान पाच वर्षांमध्ये आम्ही  हाती घेतले  आहे  . पाण्याचे योग्य नियोजन झाले पाहिजे . वाहून जाणारे पाणी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दुष्काळी भागामध्ये कसे नेता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. बेरोजगारांच्या हातांना काम देणे ही सुद्धा आपली टॉप प्रायोरिटी  असणार आहे. 


छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराची मानके  घालून दिलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पाईक आणि सेवक म्हणून मी गेली पाच वर्षे काम केले . आपल्या सर्वांना यापुढेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार     काम करायचे आहे . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या चौकटीमध्ये आपण   काम करणार आहोत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीता, बायबल ,कुराण ही  मार्गदर्शक तत्वे असल्याचे म्हंटले होते . त्यानुसार आपण काम करणार आहोत , असेही श्री. फडणवीस म्हणाले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com