मोदीजी है तो मुमकिन है :  फडणवीस   

..
NARENDRA_MODI_DEVENDRA_FADANAVIS.
NARENDRA_MODI_DEVENDRA_FADANAVIS.

मुंबई :  अजित पवार यांच्या समर्थनाने महाराष्ट्रात मजबूत सरकार स्थापन झाले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयासमोर कार्यकर्त्यांना संबोधन करताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. श्री. फडणवीस पुढे म्हणाले, मोदीजी है तो मुमकिन है, हे पुन्हा एकादा सिद्ध झाले आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे आभार मानतो.

चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप हा महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष बनला आहे. कार्यकर्त्यांमुळेच आम्हाला ही सत्ता मिळाली आहे. त्यामुळे मी तमाम कार्यकर्त्यांचे आभार मानतो. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विनोद तावडे, गिरीश महाजन, हर्षवर्धन पाटील, आशिष शेलार आदी नेत्यांनी आनंदोत्सव केला. या नेत्यांनी परस्परांना पेढे भरवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com