देवेंद्र फडणवीस सव्वा पाच वर्षांनंतर विधीमंडळाच्या पायरीवर

.....
devendra-fadnavis
devendra-fadnavis

मुंबई : राज्यातील सत्तेतून पायउतार व्हावे लागल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तब्बल सव्वापाच वर्षानंतर विधान भवनाच्या पायरीवर बसले. ठाकरे सरकारच्या नावाने बोटे मोडत भाजपने आंदोन केले.  सरकारवर मोजक्याच शब्दांत निशाणा साधलेले फडणवीस पायरीवरील आंदोलनात फारसे आक्रमक दिसले नाहीत.

राज्यात युतीचे जुने सरकार येण्याआधी म्हणजे, २००९-२०१४ या काळात फडणवीस आणि त्यांच्या पक्षाचे आमदार तत्कालीन आघाडी सरकारविरोधात आंदोलनाचा सपाटा लावला होता. सिंचन घोटाळ्यात तर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात बैलगाडी भरून पुरावे आणत या प्रकरणाकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे आंदोलनामुळे फडणवीस चर्चेत असावे. मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या फडणवीसांना गेल्याच पाच वर्षात विरोधकांच्या आंदोलनाला तोंड द्यावे लागले. याच काळात राज्य आणि केंद्रातही भाजपचीच सत्ता असल्याने फडणवीस यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली नाही.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची सत्तेची बेरीज होताच फडणवीसांना सत्ता गमवावी लागली आणि त्यांना विरोधी बाकांवर बसावे लागले. याच फडणवीसांना आपल्या जुन्या सत्ताकेंद्राच्या म्हणजे, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून ठाकरे सरकारच्या कुरापती काढव्या लागल्या. आमच्या रक्तातच विरोधी पक्षाचा डीएनए असल्याचे ते वारंवार सांगत होते. हा डिएनए आज त्यांना पुन्हा दाखवावा लागला. 

कर्जमाफीच्या मुद्दयावरून आक्रमक झालेल्या भाजपच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे, सोमवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून, सत्ताधाऱ्यांची वाट रोखली. आंदोलन सुरू होजन २० मिनिटे झाल्यानंतर फडणवीस विधान भवनाच्या आवारात आले आणि पायऱ्यांवर बसले. आपले नेते फडणवीस येताच आमदारांच्या घोषणांचा आवाज वाढला आपल्या आमदारांच्या सुरात सूर मिळण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला; पण ते फारसे आक्रमक नसल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरू जाणवत होते. त्यानंतर थेट माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, तेव्हाही अगदीच मोजक्या शब्दांत सरकारवरील आरोप आटोपते घेतले आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना पुढे केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com