देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा दिवस गाजविला...

....
devendra fadnavis
devendra fadnavis

मुंबई : कर्जमाफीच्या मुद्यावरून ठाकरे सरकारला सळो की पळो करण्याची रणनीती पहिल्या दिवशी फसल्यानंतर विरोधक अर्थात, देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सरकारविरोधात पुन्हा बाह्या सरसावल्या. विधीमंडळाच्या दारातील आंदोलन आटोपून सभागृहात प्रचंड गोंधळ घालत विधानसभा आणि मंत्र्यांच्या खुलाशाचा शब्दही फडणवीस आणि त्यांच्या आमदारांनी ऐकून घेतला नाही. 

तब्बल ३५ मिनिटे विरोधक नुसतीच आरडाओरड करीत राहिल्याने अखेर काही वेळ कामकाज तहकूब झाले. परिणामी, विरोधकांनी म्हणजे, फडणवीसांनी अधिवेनशचा दुसरा दिवस मात्र जिंकला. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी आमदारांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली. त्यानंतर काही क्षणांत सर्व आमदारांनी हा मुद्दा उचलून धरला आणि जोरजोरात घोषणा देत, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या आसनापुढे येण्यास सुरवात केली आणि गोंधळ घातला.  तेव्हा, कामकाज करू देण्याचा आग्रह पटोले यांनी वारंवार केला, तरीही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेल्या आमदारांनी महिला अत्याचार रोखण्यात अपयश आल्याचे खापर सरकारवर फोडले.

तेव्हा, 'तुमच्या म्हणजे, भाजप सरकारच्या काळात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांवर चर्चा करणार आहोत,' असे सांगत पटोले यांनी विरोधकांना चिमटे काढले. पण काही केल्या विरोधी आमदार शांत होण्याचे नाव घेत नव्हते.

त्याच गोंधळात पटोले यांनी मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर काही प्रश्न-उत्तरेही सुरू झाली पण सलग ३० मिनिटांचा गोंधळ साडेअकरापर्यंतही कायम राहिला. साहजिकच सभागृहात सरकारविरोधात विरोधाची धार कायम राहील, याची काळजी स्वत: फडणवीस घेत होते. त्यामुळे अधिवेशनाचा दुसरा दिवस हा फडणवीस यांनी गोंधळाचा ठरविला. त्यामुळे फडणवीसांनी सभागृहात आपली विरोधी नेता म्हणून छाप अधिक ठळक केल्याचे दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com