अमृता फडणवीस यांच्या सेल्फीविषयी  इतके राजकारण करण्याची गरज काय? : देवेंद्र फडणवीस 

मुख्यमंत्र्यांची पत्नीम्हणून अमृता फडणवीसयांच्याकाही जबाबदाऱ्या आहेत. त्या त्यांनी पार पाडल्या पाहिजेत. पण त्याच वेळी अमृता फडणवीस हे एक व्यक्तिमत्त्वही आहे. त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य आहे.-देवेंद्र फडणवीस
MR-&-Mrs-Fadnavis
MR-&-Mrs-Fadnavis

मुंबई :  " मुख्यमंत्र्यांची पत्नी  म्हणून  अमृता फडणवीस यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत. त्या त्यांनी पार पाडल्या पाहिजेत.  पण त्याच वेळी अमृता फडणवीस हे एक व्यक्तिमत्त्वही आहे. त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य  आहे. मी त्यांच्याशी लग्न केले म्हणजे मी त्यांना विकत घेतलेलं नाही.

त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यानुरूप जर त्यांना एखादी गोष्ट करायची असेल तर ती त्यांनी करावी. मला एक गोष्ट समजत नाही, आपण खूप मोठमोठ्या गप्पा मारतो वूमन एम्पॉवरमेंटच्या ! पण एखाद्या स्त्रीने एखादी गोष्ट स्वतंत्रपणे केली तर मात्र आपल्याला एवढी टीका का करावीशी वाटते? ,"असा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला . 

राज्य सरकारला येत्या 31 ऑक्‍टोबरला चार वर्षे पूर्ण होत असून त्या पार्श्‍वभूमी मुख्यमंत्री फडणवीस यांची विशेष मुलाखत साम टीव्ही चॅनलचे संपादक निलेश खरे यांनी घेतली. यावेळी फडणवीस यांनी विविध मुद्याना स्पर्श केला.  महाराष्ट्राच्या फर्स्ट लेडी आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सेल्फीवरून निर्माण झालेल्या वादंगावर मुख्यमंत्र्यांनी आपली मते स्पष्टपणे मांडली  . 

ते म्हणले ," महाराष्ट्रात 25 वर्षात युवा मुख्यमंत्री पाहण्याची संधी आपल्याला मिळालेली नाही. शेवटी माणसे 40 व्या वर्षी ज्या गोष्टी करतात ते 56 व्या वर्षी करत नाहीत. आणि ज्या गोष्टी 56 व्या वर्षी करतात त्या 38- 40 व्या वर्षी करीत नाही. त्यामुळे एखादे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून ती जर एखादी गोष्ट करीत असेल तर काय हरकत आहे. मी तिला एकच सल्ला देतो की, मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. त्या तिने पाळल्या पाहिजेत. बाकी तिने तिचे स्वतंत्र आयुष्य जगायचे आहे."

अमृता फडणवीस यांनी बोटवर काढलेल्या सेल्फीविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,"   सेल्फीच्या काढला  ती जर बोट आपण नीट पाहिली तर असे लक्षात येईल की  त्या फोटोचा अँगल चुकीच आहे. मुळात ती जेथे बसली तिथे एक लोअर डेक आहे. पण या अँगलमध्ये असे वाटते की हे एक टोक आहे आणि त्यानंतर पाणी आहे. फोटोत दिसत नाही की खाली डेक आहे. तिथे जातानाही कॅप्टनची तिने परवानगी घेतली. मग तिथे जाऊन बसली. मग तिने सेल्फी काढला असेल. अनेक लोक सेल्फी काढतात . सेल्फी सेफच काढला पाहिजे याबद्दल दुमत नाही. पण आता या फोटोमुळे टीका झाली तर तिने माफी देखील मागितली. मला असे वाटते की यासंदर्भात इतके राजकारण करण्याची गरज काय?"

काही लोक, जाणीवपूर्वक हे करत आहेत  असे सांगून देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले ," मी खूप जाणिवपूर्वक म्हणतो, योग्य वेळी त्याचे मी पुरावेही देईन. काही राजकीय पक्षांनी तर टीम तयार केल्या आहेत की मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला कसे टार्गेट करता येईल. पण मला असे वाटते की या स्तराला जाऊन जे लोक काम करीत आहेत, ते लोकांना आवडणार नाही. निश्‍चितपणे लोक यांच्या विरोधात जातील. मला असे वाटते की, तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. जे योग्य आहे ते तिने केले पाहिजे. अयोग्य असेल तर मी तिला सांगेन की, तुझे अयोग्य आहे. त्यासंदर्भात काय अंतिम  निर्णय करायचाय तो तिला करायचा आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com