Devendra Fadnavis confident about winning 330 seats in Lok Sabha | Sarkarnama

भाजप लोकसभेत 330 जागा जिंकणार : फडणवीस

सरकारनामा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

.

मुंबई : " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार दमदार कामगिरी करीत आहे. देशाची अर्थव्यवस्था जगात वेगाने वाढत आहे. यामुळे 2019 च्या निवडणुकीत भाजप 330 जागा जिंकणार आणि एनडीएचे सरकार केंद्रात पुन्हा येणार", असा आत्मविश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे जागवला. भाजप शक्तिकेंद्र प्रमुख संमेलनात ते बोलत होते.

ते म्हणाले, "ही निवडणूक भाजपची नसून भारताची निवडणूक आहे. ही एक देशाच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासातील ऐतिहासिक संधी आहे. यापूर्वी 2009 मध्ये केंद्रात कॉंग्रेसचे खिचडी सरकार आले होते. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना वेळ लागत होता. निर्णय घेतला जात नव्हता. त्यावेळी आपण वेळकाढू सरकार बघितले."

" मात्र त्यानंतर पाच वर्षांतच नरेंद्र मोदी यांचे सरकार आले. या पाच वर्षांत मोदींनी अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. त्यामुळे या देशाच्या इतिहासात 2020 ते 2025 हा सुवर्णकाळ आहे. ही संधी दवडता कामा नये. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम आझाद यांच्या "अग्निपंख' या पुस्तकात म्हंटल्याप्रमाणे भारत 2020 ते 2030 या काळात जागतिक महासत्ता बनेल," असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख