devendra fadnavis | Sarkarnama

दोन कलमी कार्यक्रमाचा संघर्ष यात्रेला "उतारा" ?

ब्रह्मदेव चट्टे
सोमवार, 17 एप्रिल 2017

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमकपणे जनतेच्या दरबारात गेल्यामुळे सत्ताधारी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे संघर्ष यात्रेला दोन कलमी कार्यक्रमाचा "उतारा" देण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. उत्तर प्रदेश सरकारने कर्जमाफी दिल्यानंतर राज्यातही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ही मागणी विरोधकांसह शिवसेनेने लावून धरली आहे. यामुळे सरकार कर्जमाफीच्याऐवजी सरकार दोन कलमी कार्यक्रमाचा विचार करत असल्याचे समजते. 

राज्यातील राजकारणात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्याने वातावरण तापले असून दररोज होणारे शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबायला तयार नाही. यामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होत असल्याने सरकारी पातळीवर युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. कर्जमुक्ती हा एकच उपाय नसून याबाबत इतर पर्यायांवर राज्य सरकारचा अभ्यास सुरू केला आहे. यात दोन कलमी कार्यक्रमावर सरकारचा विचार करत असून शेतकऱ्यांना पीक उत्पादनासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करून देणे व राज्यातील 22 पिकांना हमीभाव देणे हा दोन कलमी कार्यक्रम सरकार आखत असल्याचे समजते. 

या दोन कलमी कार्यक्रमानुसार शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागणार नसून त्यांच्या समस्येवर दीर्घकालीन उपाय केल्याचे सांगता येईल असा सरकारचा होरा आहे. या दोन कलमी कार्यक्रमामुळे सरकारवर साधारण 10 हजार कोटींचा बोजा पडणार असून कर्जमाफीपेक्षा कायम स्वरूपी शेतकऱ्याला मदत केल्याचा दावा सरकारला करता येणार आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा 
देण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तत्काळ कर्जमाफीचा उपाय करण्याऐवजी सरकार दोन कलमी कार्यक्रमाद्वारे विरोधकांची हवा काढून घेणार असल्याचे माहिती सूत्रांनी दिली. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख