आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये देवेंद्र फडणवीस सरस : सुधाकर देशमुख 

आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये देवेंद्र फडणवीस सरस : सुधाकर देशमुख 

नागपूर ः समाजातील सर्व घटकांचा विकास करून सर्वांना न्याय देण्याचे काम गेल्या चार वर्षात झाले असून आतापर्यंतच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांपेक्षा देवेंद्र फडणवीस हे सरस मुख्यमंत्री असल्याचा दावा भाजपचे विधिमंडळातील मुख्य प्रतोद व आमदार सुधाकर देशमुख यांनी केला आहे. 

फडणवीस यांच्या सरकारला आज चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल "सरकारनामा'शी बोलतान ते म्हणाले, की गेल्या चार वर्षात शेतकरी, कामगार, शेतमजूर, दलित, आदिवासी या सर्व वर्गाच्या विकासासाठी योजना राबविण्यात येत आहे. कामगार कल्याण मंडळाद्वारे नुकतेच कामगारांना आर्थिक मदत पहिल्यांदाच करण्यात आली आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेद्वारे जवळपास 550 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची महत्वाकांक्षी योजना राबविण्यात आली आहे.  शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या आहेत. शेतकऱ्यांच्या 100 टक्के समाधान होऊ शकत नाही. परंतु या मोठ्या वर्गाला समाधान देण्याचे काम करण्यात आले. 

गेल्या चार वर्षात सर्व घटकांना विकासाच्या योजनांमध्ये सामावून घेण्याचे काम करण्यात आले, हे मोठी उपलब्धी आहे. मुंबईतील इंदु मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाला गती मिळाली आहे. आदिवासींच्या विविध योजना राबविण्यात आल्या. नक्षलप्रभावित क्षेत्रात हिंसक घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांची जलयुक्त शिवार योजना राज्यासाठी वरदान ठरलेली आहे. या योजनेमुळे अनेक हेक्‍टर शेती सिंचनाखाली आली आहे. अत्यंत कमी खर्चामध्ये लोकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे तसेच भूजल पातळीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. याशिवाय नागपुरातील मुख्यमंत्री असल्याने नागपूर एक "एज्युकेशन हब' म्हणून विकसित झाले आहे. आज नागपुरात ट्रिपल आयटी, लॉ युनिव्हर्सिटी, आयआयएम या संस्था सुरू झाल्या आहेत. यातून कुशल कामगार मिळत आहे. शहराच्या विकासासाठी एज्युकेशन हब म्हणून शहर विकसित होण्याची गरज आहे. यासाठी दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी नागपूर विकसित करण्याचे काम झाल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com