devendra fadavnis's helicopter didn't get signal in kolhapur district | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

वारणेला जाताना मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटले 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

सिग्नल मिळत नसल्याने हेलिकॉप्टर कोल्हापूर शहरावर चक्रा मारत होते.

सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरची दिशा आज पुन्हा एकदा भरकटली.

सांगली जिल्ह्याचा प्रशासकीय आढावा घेण्यासाठी आज त्यांनी सलग चार तास मॅरेथान बैठक घेतली. त्यानंतर दुपारी 4 वाजून 15 मि. सांगलीतील कवलापूरच्या मैदानातून ते कोडोली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी निघाले होते. या हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांसमवेत सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार होते. 

सिग्नल मिळत नसल्याने हेलिकॉप्टर कोल्हापूर शहरावर चक्रा मारत होते. त्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या पृथ्वीराज देशमुख यांनी कोडोलीची दिशा पायलटला दिली. ते वारणा येथील हेलिपॅडवर उतरले. त्यामुळे नियोजित वेळपेक्षा अर्धातास उशीरा कार्यक्रमस्थळी पोहचले. हेलिकॅप्टरची दिशा चुकल्याबाबत पृथ्वीराज देशमुख यांनीच या माहितीस दुजोरा दिला. 

यापूर्वीही मुख्यमंत्री फडणवीस यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याच्या व दुर्घटना होत असताना सावरल्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये विशेष काळजी घेतली जाऊ लागली. हेलिपॅडची निवड करतानाही याबाबत फार दक्षता घेतली जात असतानाच पुन्हा असा प्रकार आज अनुभवास आल्याने यंत्रणेची तारंबळ उडाली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख